शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेरातून आता शहरावर ‘नजर’

By admin | Updated: January 20, 2015 22:33 IST

सुरक्षिततेच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील महत्वपूर्ण १८ चौकात शंभरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ७५ लाखांच्या खर्चाचे

प्रशांत देसाई - भंडारासुरक्षिततेच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील महत्वपूर्ण १८ चौकात शंभरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ७५ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. येत्या काही दिवसातच शहरातील प्रत्येक चौकातून नागरिकांवर या कॅमेरातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.एखादी अनुचित घटना घडल्यास त्या घटनेचे धागेदोरे आणि जिवंत पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरतात. मात्र, सव्वालाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. यामुळे शहरासोबतच नागरिकांच्यादृष्टिने हे धोकादायक होते. ही बाब घेरून नगरपालिका प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. शहरातील अतिमहत्वाच्या चौकासोबतच अन्य चौकातही हे कॅमेरे पालिका प्रशासन कॅमेरा लावणार आहेत. यासाठी पालिकेने दोन महिन्यापूर्वी मंजूरी दिली असून त्यासाठी अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. शहरातील १८ चौकात शंभरावर कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासाठी ७५ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शहरातील मोठ्या चौकात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरासाठी ४ लाख ८७ हजार तर लहान चौकासाठी ३ लाख ७३ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. मोठ्या चौकात पाच ते सहा तर लहान चौकात चार ते पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासाठी बनविण्यात आलेले अंदाजपत्रक पालिका प्रशासनाने अंतिम मंजूरीसाठी नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता (विद्युत) यांच्याकडे पाठविले आहे. मंजूरी मिळताच शहरात लागणाऱ्या कॅमेरासाठी ई-टेंडरीग होणार आहे.