शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीची यंदा परीक्षा होणार अन्‌ विद्यार्थी ‘फेल’ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

पालकांकडून निर्णयाचे स्वागत, ऐच्छिक विषयांचे तज्ञ्जांकडून मिळावे मार्गदर्शन अमरावती : केंद्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ...

पालकांकडून निर्णयाचे स्वागत, ऐच्छिक विषयांचे तज्ञ्जांकडून मिळावे मार्गदर्शन

अमरावती : केंद्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या नवीन नियमानुसार इयत्ता दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला असेल आणि त्याने ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासक्रमात घेतलेल्या कौशल्याधारित विषयात उत्तीर्ण झाला असल्यास त्याला उत्तीर्ण असल्याचे समजले जाणार आहे. या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऐच्छिक विषयांचे तज्ञ्जांकडून मिळावे मार्गदर्शन अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली आहे.

मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम आहे. शैक्षणिक सत्र पूर्ण करता आले नाही. ऑनलाइन शिक्षणावर विद्यार्थी अंवलबून आहेत. मात्र, नुकतेच सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय सकारात्मक ठरणारा आहे. विद्यार्थ्यांना विविध विषय ऐच्छिक देण्यात आले आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फ्रॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स इत्यादी हे ऐच्छिक विषय आहेत. त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह सब्जेक्ट’सह या नियमांच्या आधारावर ठरवली जाईल. म्हणजेच सीबीएसई परीक्षेत कोणताच विद्यार्थी नापास होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. बोर्डाकडून हा नियम विशेषत: अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. जे विद्यार्थी हुशार आहेत, परंतु, अभ्यासात थोडे कच्चे आहेत. केंद्र सरकारचे स्किल इंडिया इनिशिएटिव्हसुद्धा समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसई निश्चित केलेल्या कौशल्याधारित विद्यार्थ्यांचा रस वाढतो आहे. त्यामुळे या निर्णयाचे पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

००००००००००००००००

निर्णय विद्यार्थी हिताचा

सीबीएसई दहावीत विद्यार्थ्यांना पाच विषय अनिवार्य असतात. तसेच कौशल्याधारित विषय निवडण्याची संधी आहे. त्यामुळे अशा विषयात नापास होणाच्या प्रश्नच येत नाही. परिणामी पाचपैकी एखाद्या विषयात नापास झालेला विद्यार्थी सदर विषयाच्या करिअरसाठी पात्र घोषित केले जाईल.- सचिन दुर्गे, पी.आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल.

०००००००

कोणताच विद्यार्थी नापास होऊ नये. मात्र, सीबीएसई दहावीतील मेरीट विद्यार्थ्यांचे नुकसानाची शक्यता आहे. ‘ढ’ विद्यार्थ्यांसाठी चांगला निर्णय आहे. तसेही यंदा कोरोनामुळे शाळा बंद असून, यावर्षी साठी हा निर्णय योग्य आहे. परंतु, कायमस्वरूपी निर्णय नकोच.

- सागरिका पवार, पालक

०००००००००००००००००००००

विद्यार्थ्यांना आवडीचा विषय निवडण्याची संधी बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे, आवड असलेल्या विषयाचे नॉलेज शालेयस्तरावर मिळत आहे. भविष्यात करिअर करताना निश्चितच फायदा होईल.

- नेहा कासट, पालक

---------------------

शालेयस्तरावर प्रात्यक्षिकावर भर देऊन कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळची गरज आहे, त्यानुसार सीबीएसईमध्ये ऐच्छिक विषय घेऊन...