शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात सीबीआयची चमू दाखल

By admin | Updated: May 10, 2014 00:42 IST

विदर्भातील वाघ शिकार प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीबीआयकडे सोपविला आहे. त्यानंतर शुक्रवारी मेळघाटातील वाघ-अस्वल शिकार...

नरेंद्र जावरे - अमरावती

विदर्भातील वाघ शिकार प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीबीआयकडे सोपविला आहे. त्यानंतर शुक्रवारी मेळघाटातील वाघ-अस्वल शिकार प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची चमू दाखल झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील ढाकणा वन्यजीव परिक्षेत्रात एका वाघाची तर पूर्व मेळघाट वन विभागाच्या घटांग परिक्षेत्रातील लेणाझरी (मसोंडी) जंगलात अस्वल आणि चार वाघांची शिकार झाली होती. त्यानंतर मेळघाट टायगर, सायबर क्राईम सेलने दिल्ली, पुणे, ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तरांचल, आंधप्रदेश आदी राज्यांसह शहरामध्ये धाडी घालून तस्करांना जेरबंद करण्यात यश मिळविले. विदर्भातील वाघ शिकार प्रकरणात आर्थिक पुरवठा करणारा दिल्ली येथील सूरज पाल ऊर्फ चाचा, सरजू बावरिया, नरेश रणजीत भाटीयासह तीसपेक्षा अधिक तस्करांना अटक केली. व्याघ्र प्रकल्प व वन विभागाच्यावतीने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.