शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ‘त्या’ पारधी बांधवांची हटाव मोहीम

By admin | Updated: October 10, 2015 00:43 IST

‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश करण्यात आला असला तरी शहरातील मुख्य चौकात पारधी बांधवांनी मांडलेले बस्तान हे शहरासाठी लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे.

महापालिकेची कारवाई : पोलीस वाहनांतून धामणगावात सोडलेअमरावती : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश करण्यात आला असला तरी शहरातील मुख्य चौकात पारधी बांधवांनी मांडलेले बस्तान हे शहरासाठी लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे. परिणामी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शुक्रवारी पारधी बांधव हटाव मोहीम राबविण्यात आली. पारधी कुटुंबातील ७७ जणांना पोलीस बंदोबस्तात धामणगाव रेल्वे येथील त्यांच्या मूळ गावी नेऊन सोडले, हे विशेष.शहरात राजकमल चौक, तहसील परिसर, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन, शाम चौक, बापट चौक, सायंसस्कोर मैदान, गांधी चौकात कुटुंबीयांसह रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या पारधी बांधवांमुळे घाण, अस्वच्छता, उघड्यावर संसार अन् स्वयंपाक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाखाली पारधी बांधवांचा उघड्यावर संसार हे चित्र शहरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत असताना महापालिका प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह लावण्यात आले. अगदी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर हाकेच्या अंतरावर पारधी बांधवांनी उघड्यावर थाटलेला संसार हटविणे प्रशासनापुढे आव्हान होते. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी ४ वाजता पारधी बांधवांना मुला- बाळांसह हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई दोन ते तीन तास चालली. शहर कोतवालीचे निरीक्षक दिलीप पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई, पोलीस निरीक्षक खराटे, भारत बघेल, किशोर कान्हेरे आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.