रेल्वे पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:47+5:30

लॉकडाउनमुळे बडनेऱ्यातील रेल्वे स्थानक परिसरात वाहन पार्किंगमध्ये काही दुचाकी अडकून पडल्या आहेत. यातील चार दुचाकींंना मंगळवारी अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी मनपा झोन क्रमांक ४ मधील अग्नीशामक दलाची एक चमू घटनास्थळी पोहोचली. लोकोशेडच्या बाजूने वाळलेले गवत पेटल्याचे निदर्शनास आले.

Burn four bikes in the railway parking lot | रेल्वे पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक

रेल्वे पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : रेल्चे स्थानकावरील नवीन तिकीट बुकींग कार्यालयालगत पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
लॉकडाउनमुळे बडनेऱ्यातील रेल्वे स्थानक परिसरात वाहन पार्किंगमध्ये काही दुचाकी अडकून पडल्या आहेत. यातील चार दुचाकींंना मंगळवारी अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी मनपा झोन क्रमांक ४ मधील अग्नीशामक दलाची एक चमू घटनास्थळी पोहोचली. लोकोशेडच्या बाजूने वाळलेले गवत पेटल्याचे निदर्शनास आले. यामुळेच आग लागल्याचे पार्किंगचे संचालक रजत तिवारी यांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे दिलेल्या फिर्यादीने म्हटले आहे. रेल्वेच्या कुठल्याही संपत्तीचे या आगीत नुकसान झालेले नाही, अशी माहीती आरपीएफचे निरीक्षक बी.एस. नरवार यांनी दिली. अग्निशामक विभागाचे कर्मचारी धनराज कादे, वैभव गजभारे, गोपाळ भोकरे, नजीर अहमद हे घटनास्थळी आग विझविण्यासाठी पोहोचले होते. आगीत जळालेल्या दुचाकी पार्किंगमध्ये वेगळ््याच ठेवल्या होत्या. इतर बºयाच दुचाकी त्यापासून दूर असल्याने बचावल्यात. आग नेमकी कशामुळे लागली, हे तपासले जाणार आहे.

Web Title: Burn four bikes in the railway parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.