शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा संघ प्रथमच राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:13 IST

येथील पोलीस मुख्यालयाच्या क्रिडांगणावर शनिवारी झालेल्या अमरावती विभागीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बुलडाणा संघाने गत पाच वर्षांपासून विभागीय स्पर्धेतील विजेता.......

ठळक मुद्देविभागीय नेहरू कप हॉकी : अमरावती संघ उपविजयी, पोलीस ग्राऊंडवर खेळले गेले सामने

नीलेश भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील पोलीस मुख्यालयाच्या क्रिडांगणावर शनिवारी झालेल्या अमरावती विभागीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बुलडाणा संघाने गत पाच वर्षांपासून विभागीय स्पर्धेतील विजेता अमरावती संघाचा तीन विरुद्ध शून्य गोलने दणदणीत पराभव करून प्रथमच राज्यस्तरावर दिमाखात प्रवेश केला.क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ यांच्यावतीने व पोलीस मुख्यालय यांच्या सहकार्याने १६ व १७ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवारी १५ वर्षाआतील नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आली. यात अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ असे चार संघ सहभागी झाले होते. दुपारी ३.३० वाजता अमरावती विरुद्ध बुलडाणा संघादरम्यान अंतिम सामना झाला. अमरावती संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र बुलडाणा संघानेही तुल्यबळ लढत दिल्याने सामना रंगतदार झाला. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला बुलडाणाच्या नयन ढोणे याने रिव्हर्स शॉटने सुरेख गोल करीत संघाला १-० गोलची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर बुलडाणा संघाला मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर परत नयननेच लागोपाठ दुसरा गोल करीत अमरावती संघाला दबावात आणले. सामना संपण्याच्या आठ मिनिटापूर्वी अमरावती संघाच्या अनसने गोल अंतर करून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुलडाणा संघाने गोल करण्याची लय कायम ठेवत शेवटच्या मिनिटात तिसरा गोल केला. विजय क्षीरसागरने हा विजयी गोल करीत बुलडाणा संघाला तीन विरुद्ध एक गोलने दिमाखदार विजय मिळवून देत राज्यस्तरावर प्रवेश निश्चित केला.तत्पूर्वी अमरावती संघाने अकोला संघाचा तीन विरुद्ध एक गोलने तर बुलडाणा संघाने यवतमाळ संघाचा एक-शून्य गोलने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचे पंच म्हणून नागपूरचे प्रमोद जैन, पंकज वाघधरे, सुशील बागडे, धनंजय शेखदार, संतोष वट्टी यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक म्हणून क्रीडा अधिकारी राहुल कपाळकर यांनी जबाबदारी सांभाळली.नागपूरचे पंचजिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी व शालेय स्पर्धेच्या आयोजनात पाचही सामन्यात वाद व पंचावर आक्षेप घेण्यात आल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाने विभागीय स्पर्धेचे आयोजन स्थानिक हॉकी संघटनेचे सहकार्य न घेता स्वत: करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी येथील पोलीस मुख्यालयाला विभागीय हॉकी स्पर्धेसाठी क्रिडांगण व पंच उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच तटस्थ पंच म्हणून विदर्भ हॉकी संघटना नागपूरकडे पंचाची मागणी केली, हे विशेष.