शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावातील १९ सेवा सहकारी संस्थांचा वाजणार बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

मोहन राऊत धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या महामारी संकटांनंतर काही जिल्ह्यातील स्थिती पूर्वपदावर येत असल्याने सहकार विभागाने मागील दोन वर्षांपासून ...

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या महामारी संकटांनंतर काही जिल्ह्यातील स्थिती पूर्वपदावर येत असल्याने सहकार विभागाने मागील दोन वर्षांपासून लांबलेल्या सहकारातील निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन केले असून, तालुक्यातील खरेदी-विक्री संस्थांसह १९ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक सहा टप्प्यांत घेण्यात येणार आहेत.

धामणगाव तालुक्यात ४३ सेवा सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, कर्ज वाटप व वसुली कमी असल्याने १२ संस्था अवसायनात काढत येथील सभासद नजीकच्या सेवा संस्थेला जोडण्यात आले. सध्या ३१ सेवा सहकारी संस्था कार्यरत असून, यातील १९ संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत घेण्यात येणार आहे. चालू वर्षांच्या कर्जदार सभासदांपैकी केवळ एकच उमेदवारांनी अर्ज सादर केलेल्या गतवर्षीच्या खर्डा सेवा सहकारी संस्थेची स्थगित झालेली व सध्या प्रशासक असलेल्या या खर्डा संस्थेची निवडणूक दुस०या टप्प्यात घेण्यात येणार आहे. तिस०या टप्प्यात दिघी महल्ले, पिंपळखुटा, गव्हा फरकाडे, विरुळ रोघे, वडगाव राजदी, अशोकनगर, अंजनसिंगी येथील सेवा सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. चौथ्या टप्प्यात सोनोरा काकडे, सोनेगाव, देवगाव, विटाळा, तुळजापूर, शेंदूरजना खुर्द, दाभाडा, वाघोली, कासारखेड, तळेगाव दशासर या संस्थेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. पाचव्या टप्प्यात मंगरूळ दस्तगिर, जळगाव आर्वी, दत्तापूर धामणगाव खरेदी विक्री संस्था तसेच सहाव्या टप्प्यात कल्पतरू कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक होणार आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

दृष्टिक्षेपात धामणगाव तालुका

दुसरा टप्पा - १

तिसरा टप्पा - ७

चौथा टप्पा - १०

पाचवा टप्पा - ३

सहावा टप्पा - १ (कर्मचारी पतसंस्था)

कोट

धामणगाव तालुक्यातील सहा टप्प्यांत निवडणुका घेण्याचे नियोजन तालुकास्तरावरुन करण्यात येणार आहे. सहकार विभागाच्या पुढील आदेशानुसार मतदार यादी अपडेट करण्यात येईल.

- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती

कोट

तालुक्यातील ३१ कार्यरत सेवा सहकारी संस्थांपैकी १९ संस्था निवडणुकीस पात्र आहेत. जिल्हास्तरावरून आदेश प्राप्त होताच मतदार यादी तयार करण्यात येईल.

- सुनील भगत, तालुका व्यवस्थापक, देखरेख सहकारी संस्था, धामणगाव रेल्वे