शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

कामात पारदर्शकता आणा

By admin | Updated: February 16, 2015 00:28 IST

राज्य शासनाच्या नियमानुसार प्रकल्प भागातील स्थानिकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. सोफियात परप्रांतीयांना नोकरी देण्यात आल्याचे प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे, ...

अमरावती : राज्य शासनाच्या नियमानुसार प्रकल्प भागातील स्थानिकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. सोफियात परप्रांतीयांना नोकरी देण्यात आल्याचे प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे, ही बाब ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात, त्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळावी, असा नियम असताना त्यांनी नोकरीसाठी पायपीट का करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कामे करताना पारदर्शकता आणा, ज्या जागा भरायच्या आहेत, त्यांची वृत्तपत्रात जाहिरात देऊन यादी प्रसिद्ध करा, असे निर्देश ना. पोटे यांनी दिले. प्रकल्पग्रस्तांना नोकरी, मोबदल्यासाठी जो त्रास होत आहे, त्याच्या भडका उडाल्यास खैर राहणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. रोजगार देताना पारदर्शकता आणा, कोणाचाही वशीला मागू नका, जे योग्य असेल तेच करा, अन्यथा सोफियाच्या अधिकाऱ्यांना राहणे कठीण होईल, असे त्यांनी सुणावले. मला ‘मिनिस्टरी’ ही जनतेसाठी मिळाली असून न्याय देण्यासाठी त्यांच्याच बाजूने उभा राहील. जमीन देताना ती शेतकऱ्यांनी इंडिया बुल्स कंपनीला दिली असून नोकरीचे हमी पत्रदेखील त्याच कंपनीच्या नावे मिळावेत, असे पालकमंत्री सांगितले. तसेच क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांचा विषय हाताळताना रस्ते दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावी, शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून त्याच्याजवळ विष घ्यायलाही पैसे नाहीत, अशी व्यथा मांडताना पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना शेतकरीविरुद्ध सोफिया कंपनीला संरक्षण देऊ नका, अशा सूचना केल्यात. प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश शिगेला पोहचत असून तेच सोफिया प्रकल्पाचे मालक आहेत. त्यामुळे नोकरी देताना मार्ग काढा, पारदर्शकपणे नोकरभरती राबवा, कुणालाही मागच्या दाराने नोकऱ्या देऊ नका, समोरच्या दाराचा वापर करा, अशी तंबी सुद्धा पालकमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना न्याय देताना कोणतीही तडजोड करणार नाही. केवळ पारदर्शकता आणूनच काम झाले पाहिजे, अन्यथा सोफियाची खैर नाही, असेदेखील पालकमंत्री सांगितले. (प्रतिनिधी)