थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:03+5:302021-02-25T04:16:03+5:30

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा येथे संत गाडगेबाबा जयंती कोरोना त्रिसूत्रीचे पालन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनिल अलोकार, ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा येथे संत गाडगेबाबा जयंती कोरोना त्रिसूत्रीचे पालन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनिल अलोकार, हरिनारायण माकोडे, मनीष खाडे, अंबादास तसरे रमेश कौलखेडे, अक्षय काळमेघ, विक्की वाकाडे, विलास खाडे, राजू काळमेघ उपस्थित होते.

..................

संजवनी कॉलनीतील नालीची दुरवस्था

अमरावती : गाडगेनगर प्रभागातील संजवनी कॉलनी कुबडे यांचे घरामागून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची दुरवस्था झाली आहे. नालीची साफसफाई केली नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाली दुरूस्ती व स्वच्छतेची मागणी नागरिकांनी केली.

......................................

स्थायी समितीच्या सभेची तयारी

अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा येत्या शुक्रवारी होत आहे. या अनुषंगाने सभेची तयारी सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.

........................................

मिनीमंत्रालयातील गर्दी ओसरली

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतही एरव्ही दररोज राहणारी नागरिकांची वर्दळ सध्या ओसरली आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.