शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत महसूल विभाग, पोलिसांत काट्याची टक्कर

By admin | Updated: May 3, 2015 00:23 IST

राज्याच्या तिजोरीत भर टाकण्याची जबाबदारी असलेले महसूल खाते स्वत:चा खिसा गरम करण्यात पहिल्या स्थानावर आहे,...

आकडेवारी : एसीबीच्या कारवाईत महसूल विभाग अव्वलस्थानीसुरेश सवळे चांदूरबाजारराज्याच्या तिजोरीत भर टाकण्याची जबाबदारी असलेले महसूल खाते स्वत:चा खिसा गरम करण्यात पहिल्या स्थानावर आहे, तर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलिसांनी दुसरा क्रमांक मिळविला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने १ जानेवारी २०१५ पासूनच्या कारवाईचा तपशील संकेतस्थळावर दिला आहे. त्यात गेल्या ११७ दिवसांत महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या १०० प्रकरणांत १३० मासे गळाला लागलेत, तर पोलीस खात्यातील ८५ प्रकरणांत ११२ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ४०२ सापळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात एकूण ५२० लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे एसीबी चांगलीच सक्रिय झाली असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर बघायला मिळत आहे. या आकडेवारीनुसार सर्वात जास्त भ्रष्ट विभागात महसूल विभागाने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. त्या खालोखाल पोलीस विभागाचा दुसरा क्रमांक लागलाय. १ जानेवारी ते २७ एप्रिल २०१५ दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून एसीबीने केलेल्या कारवाईत सर्वाधिक सापळे पुणे परिक्षेत्रात तर सर्वात कमी सापळे हे राज्याची राजधानी मुंबई शहरात रचण्यात आले व यशस्वी करण्यात आले. या एकूण ११७ दिवसांत तब्बल ५२० लाचखोरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वात जास्त महसूल विभागाचे कर्मचारी आहेत. त्या खालोखाल पोलीस विभागाचा नंबर लागतो. महसूल विभागातील एकूण १०० प्रकरणांत क्लास वनचे २, क्लास टूचे ४ अधिकाऱ्यांसह एकूण १०० कर्मचाऱ्यांवर तर पोलीस विभागात क्लास वनचे ६, क्लास टूचे ६ अधिकाऱ्यांसह एकूण ११२ कर्मचाऱ्यांविरोधात एकूण ८५ प्रकरणी एसीबीने कारवाई केली आहे. पोलीस विभाग व राज्याच्या तिजोरी भरण्याची महत्वाची जबाबदारी असलेला महसूल विभागच भ्रष्टाचाराने किती बरबटलेला असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.