शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

जवाहर कुंडात सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : सोमवारी दुपारी २.३० वाजता सेमाडोह येथील सिपना नदीच्या जवाहर कुंडात बेपत्ता झालेल्या राजस्थान येथील ...

ठळक मुद्देउपाययोजना करण्याची गरज : मृत युवक राजस्थानचा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : सोमवारी दुपारी २.३० वाजता सेमाडोह येथील सिपना नदीच्या जवाहर कुंडात बेपत्ता झालेल्या राजस्थान येथील युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी ९ वाजता पोलीस व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या जवाहर कुंडामध्ये बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून हैदराबाद येथे जाणारे मजूर सोमवारी दुपारी २.३० वाजता सेमाडोह नजीकच्या सिपना नदीतील जवाहर कुंड येथे जेवणासाठी थांबले होते. त्यातील राजुराम पुंजाराम जाट (२४. रा भोंडीकल्ला, ता. डेगाना, जिल्हा नागौर, राजस्थान) हा युवक शौचास गेला. मात्र, तो परतला नाही. डोहात बुडाल्याची शक्यता सहकाऱ्यांनी वर्तविली होती. पोलिसांनी मंगळवारी सकाळी स्थानिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविली.डोहातील एका कपारीतून त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची फिर्याद सहकारी श्यामसुंदर देशराज जाट (रघुनाथपुरा, नागौर) यांनी चिखलदरा पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास चिखलदऱ्याचे ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात जमादार दिनेश तायडे, प्रशांत ताते करीत आहेत.आंतरराज्य मार्गावर कुंड; मोठ्या प्रमाणात वाहतूकचिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच तालुक्यातील सेमाडोह येथे व्याघ्र प्रकल्पाचे निसर्ग निर्वाचन संकुल आहे. मेळघाटच्या घाटवळणातून आपले अस्तित्व जपणारी मोठी अशी सिपना नदी येथून वाहते. याच नदीत जवाहर कुंड हा मोठा धबधबा असून, येथे वर्षभर पाणी राहते. त्यामुळे पर्यटक व रस्त्याने जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात येथे थांबतात. सेमाडोह हे अमरावती-धारणी-इंदूर या आंतरराज्य मार्गावर असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. आतापर्यंत याठिकाणी जवळपास सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून व्याघ्र प्रकल्पाने येथे फलक लावणे व आनुषंगिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Deathमृत्यू