शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह तिवसा ठाण्यात

By admin | Updated: September 21, 2015 00:02 IST

शेतीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक झाल्याने शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी तिवसा पोलीस ठाण्यांतर्गत काटपूर येथे घडली.

शेती व्यवहारात फसवणूक : काटपूरच्या किशोर सोनोने यांची आत्महत्यातिवसा : शेतीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक झाल्याने शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी तिवसा पोलीस ठाण्यांतर्गत काटपूर येथे घडली. फसवणूक करणाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह रविवारी तिवसा ठाण्यात आणल्यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. तिवसाचे ठाणेदारांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून सायंकाळपर्यंत अटक करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. किशोर पांडुरंग सोनोने रा. काटपूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात किशोर याचा मावसभाऊ भूषण यावले (रा.तिवसा) याने तिवसा ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली. यानुसार मृत किशोर याची काटपूर येथे सर्वे नं. ३४/१ एक हेक्टर ५२ आर पैकी २० आर शेतजमीन सिंचनाखाली होती. ही शेती विकणाऱ्या अमरावती येथील वंदना विजय सावरकर यांच्याशी १० लाखांचा व्यवहार १० फेब्रुवारी २०१५ रोजी झाला होता. वंदनाने २ लाख ८० हजार १०० रुपयांचे मुद्रांकावर इसारचिठ्ठी केली व १५ एप्रिल २०१५ ही शेत खरेदी करण्याची तारीख दिली. उर्वरित ७ लाख २० हजार रुपये खरेदीच्यावेळी देण्याचे ठरले. प्रत्यक्षात वंदनाने त्यांच्या परिचित सुनील वसंतराव ठाकरे (रा.अमरावती) यांच्या नावाने तिवसा दुय्यम निबंधक कार्यालयात १३ एप्रिल रोजी सदर शेताची खरेदी किशोरकडून केली व उर्वरित रक्कम नगदी न देता तेवढ्या रकमेचा चेक एचडीएफसी बँक, शेगाव नाका, अमरावती शाखेचा दिला. किशोरने चेक वटविण्यासाठी २५ एप्रिल रोजी बँकेत दाखल केला असता तो अनादर झाला. मृताने पैशाची मागणी केली असता वंदना यांच्याव्दारे किशोरविरुद्ध तिवसा ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. किशोर याने ९ सप्टेंबर रोजी वकिलामार्फत वंदना हिला नोटीस पाठविली होती. मात्र त्यालाच वारंवार फोन करून गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे झालेली फसवणूक व त्रासाला कंटाळून किशोर याने शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यासाठी नातेवाईकांनी रविवारी किशोरचा मृतदेह तिवसा ठाण्यात आणला होता. याप्रकणी तिवसा ठाण्यात वंदना विजय सावरकर अमरावती व सुनील ठाकरे यांच्याविरुद्ध भांदविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार अनिल लाड यांचे मार्गदर्शनात स.पो. निरीक्षक तेलंग पुढील तपास करीत आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीत फसवणुकीचा उल्लेखमृतक शेतकरी किशोर सोनोने यांनी लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये शेतीच्या व्यवहारात ७ लाख २० हजार रुपयांनी. वंदना सावरकर व सुनील ठाकरे यांनी फसवणूक केल्याचा उल्लेख आहे. वंदनाच्या सांगण्यावरुन सुनीलला खरेदी करुन दिली व या रकमेचा चेक अनादर झाल्याचे नमूद आहे.किशोर ठाकरे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीवरील हस्तक्षराची हस्ताक्षर साकारुन तपासणी केली जाईल.-मयुर तेलंग, तपास अधिकारी, तिवसा ठाणे