श्रमप्रतिष्ठा दिन : व्यथा मेळघाटच्या आदिवासींचीलोकमत दिन विशेषनरेंद्र जावरे चिखलदराना वेळेचे बंधन, ना कामाची भीती, कुशल असो की अकुशल पाठीवर चिमुकल्यांसह बिऱ्हाड घेऊन निघालेल्या आदिवासींचे काम जास्त दाम कमी जसे काहीसे म्हणावे लागेल. श्रमदिन असतानाही हा कसला दिवस हे उत्तर त्यांच्या कार्यात ते किती मग्न आहे, हे सांगून जाते.देशपातळीवर २२ सप्टेंबर हा दिन श्रमदिन म्हणून पाळला जातो. कधी मेळघाटच्या या आदिवासी मजुरांनी मागणी केली नाही. पोटासाठी रात्रंदिवस राबराब राबून जिकडे रस्ता मिळेल त्या मार्गाने श्रमासाठी निघालेले आदिवासींचे थवे न थकता देशभर जातात. आणि फसवणुकीसह कडू-गोड अनुभव आठवणी घेऊन आपल्या मायदेशी मेळघाटच्या रस्त्यात वसलेल्या नागमोडी मार्गावरील उंच टेकडीच्या कपारित निवांत थकवा दूर करतात. मेळघाटातील आदिवासी अज्ञानी, अंधश्रध्देच्या खाईत असल्याने कुपोषणासारख्या चक्रातून ते बाहेर निघत नसल्याची ओरड आता खोटी ठरत आहे. खरं तर आदिवासींच्या हाताला काम नाही. वर्षभर भटकंती करावी लागत असल्याचे सत्य आहे. मेळघाटात काय करायला हवे यासाठी मागील १९९३ पासून केवळ प्रयोग सुरु आहे. २२ वर्षांपासून कायमस्वरुपी प्रयोगशाळा ठरलेल्या आदिवासींचे श्रम कुणीच जाणून घेतले नाही.१८१ रुपये रोजमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आदिवासींना १८१ रुपये रोज प्रमाणे वेतन दिल्या जाते. तर ईमारत बांधकामावर किमान २५० रुपया प्रमाणे मोबदला दिला जात आहे.किती दिवस रोजगार हमी?राज्य शासन असो की, केंद्र शासन मेळघाटातील कायमस्वरुपी रोजंदारीचा प्रश्न मिटविण्यात सतत अपयशी ठरले आहे. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आदिवासींना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात उघडून दिली की संपला विषय. एवढे मात्र नेहमीचे झाले आहे. कालपर्यंत अज्ञानी मजूर या कामावर होते. आज मात्र डीएडचे झालेले सुशिक्षित बेरोजगार या रोजगार हमी योजनेचे मजूर झाले आहेत. मुलगा सुशिक्षित बेरोजगार असताना मुलगा शिक्षित झाला. परंतु दोघांनाही पोटासाठी श्रम करावे लागत आहे.
पाठीवर बिऱ्हाड, ना श्रमाच मोल, पोटासाठी भटकंती सुरूच
By admin | Updated: September 22, 2015 00:27 IST
ना वेळेचे बंधन, ना कामाची भीती, कुशल असो की अकुशल पाठीवर चिमुकल्यांसह बिऱ्हाड घेऊन निघालेल्या आदिवासींचे काम जास्त दाम कमी जसे काहीसे म्हणावे लागेल.
पाठीवर बिऱ्हाड, ना श्रमाच मोल, पोटासाठी भटकंती सुरूच
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}