शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत चाचणी परीक्षा गैरप्रकाराची चौकशी होणार

By admin | Updated: September 29, 2015 01:35 IST

पायाभूत चाचणी परीक्षांमध्ये शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच लिखीत उत्तरे दिलीत. ही बाब वृत्तातून लोकमत ने

वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीपायाभूत चाचणी परीक्षांमध्ये शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच लिखीत उत्तरे दिलीत. ही बाब वृत्तातून लोकमत ने उघड केल्यावर शिक्षण विभागात खळबळ उडाली. या गैरप्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी घेतला असून संबंधित शाळेत जाऊन तीन अधिकारी चौकशी करणार आहेत. शिक्षणाच्या दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी सर्व शाळामध्ये पायाभूत चाचणी घेण्याचे आदेश शासनाने शिक्षणाधिकारींना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील २ हजार २०० शाळेत इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा सुरू झाली. १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून आतापर्यंत बहुतांश शाळांनी ही चाचणीसुध्दा घेतली आहे. मात्र, शहरातील काही शाळेमध्ये पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित देण्यात येत असल्याची माहिती 'लोकमत'ला मिळाली. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पायाभुत चाचणीचे लिखित उत्तरे देत असल्याचे 'लोकमत'च्या निदर्शनास आले आहे. याबाबत 'लोकमत'ने २४ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करताच शिक्षण विभागात खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेऊन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी चौकशी सुरु केली आहे. या चौकशीकरिता तीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ते संबंधित शाळेची चौकशी करणार आहे.