शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लाभ मिळेपर्यंत बँक व्यवस्थापकाची खुर्ची जप्त

By admin | Updated: February 26, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्ज पुरवठा व अन्य बँकिंग सुविधा मिळेपर्यंत ‘खुर्ची’ तारण ठेवण्याची नामुष्की आसेगाव पूर्णा येथील इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापनावर ओढवली.

बच्चू कडू यांचे आंदोलन : बँक व्यवस्थापनाकडून माफीनामाआसेगाव पूर्णा : शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्ज पुरवठा व अन्य बँकिंग सुविधा मिळेपर्यंत ‘खुर्ची’ तारण ठेवण्याची नामुष्की आसेगाव पूर्णा येथील इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापनावर ओढवली.आ.बच्चू कडू यांनी शेकडो शेतकऱ्यांसह गुरुवारी आसेगाव गाठून इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची खुर्ची बाहेर काढून आंदोलन केले. ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलनाला मूर्तरुप आले.इंडियन बँकेने ५ वर्षांपासून पीक कर्जाचा लाभ घेतलेल्या एकाही शेतकऱ्याला व्याजमाफीचा लाभ दिला नाही. शासनाकडून व्याजाच्या रकमेचा भरणा बँकेत करण्यात येत असताना या शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली करण्यात आली. त्या पार्श्वभूमिवर गुरुवारी आ.कडू यांनी शाखा व्यवस्थापकाची खुर्चीच ‘तारण’ ठेवली आणि शाखा व्यवस्थापकानेसुद्धा मागण्यांची पूर्तता आम्ही करत नाही, तोपर्यंत स्वेच्छेने खुर्ची जप्त करून देत आहोत, असे लिहून दिले.दोन दिवसांपूर्वी आ. कडू यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलनाचे पत्र अग्रणी बँक, पोलीस अधीक्षक व इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला दिले होते. त्यानुसार गुरुवारी आ. कडू शेकडो शेतकऱ्यांसह या बँकेत पोहोचले. यावेळी राजेश वाटाणे, राजेश सोलव, प्रशांत नागापुरे, रामदास कैथवास, अजय तायडे, बसवंत कनोजे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांची माफीसन २०१३-१४ च्या पीककर्ज व्याजमाफीचा लाभ शेतकऱ्यांना न दिल्यामुळे बँक व्यवस्थापकाने आ. कडू यांच्यासह शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली. त्यांना व्याजासह रक्कम एक महिन्यात परत करण्यात येईल. याशिवाय १ लाखापर्यंतचे पीककर्जाला तत्काळ व्याजमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. याशिवाय श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानातून कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याची हमी मिळाल्यानंतर आंदोलन संपविण्यात आले.