कुंटनखाणाप्रकरणी महिला आरोपीला जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST2021-02-07T04:13:23+5:302021-02-07T04:13:23+5:30

अमरावती : देहविक्री व्यवसाय प्रकरणातील महिला आरोपीचा न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला, तर दुसरा आरोपी वैभव ओंकार ढेले (२७ ...

Bail granted to woman accused in Kuntankhana case | कुंटनखाणाप्रकरणी महिला आरोपीला जामीन मंजूर

कुंटनखाणाप्रकरणी महिला आरोपीला जामीन मंजूर

अमरावती : देहविक्री व्यवसाय प्रकरणातील महिला आरोपीचा न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला, तर दुसरा आरोपी वैभव ओंकार ढेले (२७ रा. खेरडा, कारंजा, जि.वाशिम) याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

गुरुवारी रात्री बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत खंडेलवालनगरातील शाहु लेऑऊटमधील देहविक्री अड्ड्याचा भंडाफोड शहर गुन्हे शाखेने केला होता. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी एका महिला आरोपीसह वैभव ढेलेला अटक केली. तर देह विक्रीस्थळी उपस्थित असलेल्या दोन्ही मुलींना नागपूर येथील पुनर्वसन सुधारगृहात पाठविले. याप्रकरणातील आरोपी महिलेसह वैभव ढेलेला ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयातील पाचवे न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात महिला आरोपीकडून अभियोक्ता विश्वास वैद्य यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेला १५ हजार रुपयांच्या बॉन्डवर व यापुढे असले कृत्य करणार नाही, या अटीवर जामीन मंजूर केला.

Web Title: Bail granted to woman accused in Kuntankhana case