शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

क्र ांती मोर्चातून बहुजनांचा हुंकार

By admin | Updated: December 26, 2016 00:19 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यकांच्या न्याय,

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करा अमरावती : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यकांच्या न्याय, हक्कासाठी रविवारी क्रांती मोर्चाद्वारे बहुजनांनी हुंकार दिला. मोर्चातील सहा महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविले. येथील संविधान सन्मान समितीच्यावतीने बहुजन क्रांती मोर्चाला छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दुपारी दीड वाजता प्रारंभ करण्यात आला. स्थानिक सायन्सस्कोर मैदानातून निघालेला मोर्चा पुढे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकातून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे संयोजक राहुल मोहोड, जोगेंद्र मोहोड, कृष्णा गणवीर, सुनील गजभिये, किरण गुडधे, अमोल इंगळे, प्रभाकर घोडेस्वार, उत्तमराव भैसने, महेश तायडे आदींनी मोर्चाला संबोधित केले. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. घोषणांनी आसमंत दणाणला अमरावती : मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तहसीलदार सुरेश बगळे यांनी मोर्चातील काही महिला, पुरूषांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले. यावेळी काही मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी केली. परंतु पोलिसांनी सहा महिला व पुरूषांचे शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्यासाठी जावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना विविध १९ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी गित्ते यांना निलिमा पवार, स्हेनल आमटे, माया भिवगडे, संगीता मिसरे, प्रणाली खोब्रागडे, अनू वानखडे या महिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून बहुजनांच्या मागण्या मांडल्यात. यावेळी ‘एकच पर्व, बहुजन सर्व व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ आदी नारेबाजी केली. यावेळी बळवंत वानखडे, वसू महाराज, प्रशांत कांबळे, केशव वानखडे, सुदाम बोरकर, प्रमोद गवई, सतीश भालेराव उपस्थित होते.