बऱ्हाणपूर येथे राष्ट्रीय मतदार दिनी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:16+5:302021-02-05T05:34:16+5:30

मोर्शी :स्थानिक पंचायत समितीशी संलग्न बऱ्हाणपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने मतदार जनजागृती ...

Awareness on National Voters' Day at Barhanpur | बऱ्हाणपूर येथे राष्ट्रीय मतदार दिनी जनजागृती

बऱ्हाणपूर येथे राष्ट्रीय मतदार दिनी जनजागृती

मोर्शी :स्थानिक पंचायत समितीशी संलग्न बऱ्हाणपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आला.

मोर्शी तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील यादी भाग क्रमांक २९८ चे बी.एल.ओ. मुख्याध्यापक नीलेश इंगोले यांनी ग्रामस्थांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याविषयी जनजागृती करण्यासाठी हे आयोजन केले. याप्रसंगी मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याबाबत शपथ देण्यात आला. गावातून मतदार जनजागृती रॅलीच्या माध्यमातून १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्वांना मतदार यादीत नावनोंदणी व मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगच्या सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर तुळे, मुख्याध्यापक नीलेश इंगोले, सहायक शिक्षक दिलीप चांदुरे, अंगणवाडी सेविका विमल ढगे व सोनाली ढेवले, नर्मदा शेरे, दिनेश झाडे, राजेंद्र झाडे, महेंद्र गायकी, उमेश भागवत, रवींद्र भागवत, दिलीप तुळे, किसना वाकपैजन, प्रवीण तुळे, सतीश ढगे, अर्पिता ढेवले, ईश्वरी शेकार, दीपक तुळे तसेच नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता.

Web Title: Awareness on National Voters' Day at Barhanpur