शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्युप्रकरणी आॅटोरिक्षा चालकाला एक वर्ष कारावास

By admin | Updated: February 16, 2015 00:12 IST

अपघातात एका सात महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या आॅटोचालकाला दोषी ठरवून येथील प्रथम श्रेणी न्यायाधिशांनी विविध कलमांखाली शिक्षा आणि दंड ठोठावला.

मोर्शी : अपघातात एका सात महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या आॅटोचालकाला दोषी ठरवून येथील प्रथम श्रेणी न्यायाधिशांनी विविध कलमांखाली शिक्षा आणि दंड ठोठावला. यात तीन हजार रुपये दंड नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशीत केले.शिक्षापात्र आॅटोरिक्षाचालकाचे नाव सागर अशोकराव डबरासे (रा.लोणी,ता.वरुड) असे आहे. अमोल किसनराव बेलसरे (रा. हिवरखेड) यांच्या पत्नी जया बेलसरे या १५ मार्च २०१३ रोजी अन्य महिलांसोबत मोर्शी येथून हिवरखेडला आॅटोरिक्षाने परतल्या. आॅटोरिक्षातून उतरताच लोणी येथून हिवरखेडकडे येणाऱ्या आॅटोरिक्षाने जया बेलसरे यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा सात महिन्यांच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जया बेलसरेसुध्दा जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर अमोल बेलसरे यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी सागर डबरासे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास जमादार राजेंद्र टेकाडे यांनी केला. प्रकरण येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांच्या न्यायालयात सादर केले. शासनातर्फे सरकारी वकील शैलेश साहू यांनी फिर्यादीसह एकूण सहा साक्षीदार तपासले. साक्षी-पुराव्यानंतर प्रथम श्रेणी न्यायाधीश अमोल सुर्वे यांनी आरोपी सागर डबरासेविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सागरला कलम २७९ अंतर्गत ३ महिने साधा कारावास व १ हजार रूपये दंड, कलम ३३७ अंतर्गत ३ महिने साधा कारावास व ५०० रूपये दंड आणि ३०४ अ अंतर्गत १ वर्षे साधा कारावास आणि ३ हजार रूपयेदंडाची शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)