शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांमध्ये ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

पान २ ची बॉटम कल्पक प्रयोग : वास्तविकतेला कल्पकतेची जोड नांदगाव खंडेश्वर : सद्यस्थितीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात वापर ...

पान २ ची बॉटम

कल्पक प्रयोग : वास्तविकतेला कल्पकतेची जोड

नांदगाव खंडेश्वर : सद्यस्थितीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात वापर केला जातो व विद्यार्थ्यांना नवनवीन अध्ययन अनुभव देऊन शैक्षणीक गुणवत्ता विकास करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहे. असाच एक उपक्रम नांदगाव तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अंकुश गावंडे यांनी राबविला आहे. ते चार वर्षांपासून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट आपल्या शाळेत राबवत आहेत. तो प्रकल्प आता तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविला जाणार आहे.

अंकुश गावंडे यांनी ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात वापर केला. यासाठी विविध ऑगमेंटेड अ‍ॅप व त्यावरील चित्र शोधून काढले व त्याचा प्रभावी वापर करून विद्यार्थी गुणवत्ता विकास व विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीसाठी केला तसेच त्यांनी स्वत: आपल्या वर्गाच्या पाठ्यपुस्कांमधील घटकांची चित्रे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित बनविली व तशा अ‍ॅपचीसुद्धा निर्मिती केली. या उपक्रमाची दखल केंद्रप्रमुख विलास राठोड यांनी घेतली. या उपक्रमाला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना वानखडे यांनी भेट दिली. या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात अतिशय फायदा होतो, असे निदर्शनास येताच त्यांनी हा उपक्रम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी कोरोनाचे नियम पाळून १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले. अंकुश गावंडे यांच्यामार्फत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणामधे प्रत्येक विषयातील घटक शिकविताना ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा कसा प्रभावी वापर करता येतो, याचे प्रात्यक्षिक दिले गेले. शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना विविध ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप व चित्रांचे संकलन दिले गेले.

काय आहे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हे एक असे तंत्रज्ञान आहे, जे वापरकर्त्याच्या वास्तविक जगावर आभासी वास्तवाचे अध्यारोपण करते. हे वापरकर्त्याद्वारे पाहिलेले वास्तविक दृश्य आणि संगणकाद्वारे उत्पन्न केलेल्या आभासी देखाव्याचे संयोजन करते. यामध्ये आवाज, चित्रे, आणि इतर गोष्टींचा वापर होतो, ज्यामुळे आपण आपल्या सभोवतालच्या परिसराशी जोडून जातो. या तंत्रज्ञानामुळे वास्तविकता आणि कल्पकता यामधील अंतर अत्यंत अस्पष्ट होते. मोटर, आरोग्य, दुरुस्ती, शिक्षण, प्रशिक्षण, रिटेल शोकेसिंग, डायग्नोस्टिक्स यासारख्या विविध वापरांसाठी ऑगमेेंटेड रिअ‍ॅलिटी वाढत्या प्रमाणात स्वीकारली जात आहे.