शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तेरवीच्या रकमेतून विद्यार्थी वसतिगृहाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा लहान येथील नामदेव फकीरजी टिपरे यांच्या निधनानंतर त्यांच्या तेरवीची रक्कम जाधव कुणबी विद्यार्थी वसतिगृहाला देण्यात ...

मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा लहान येथील नामदेव फकीरजी टिपरे यांच्या निधनानंतर त्यांच्या तेरवीची रक्कम जाधव कुणबी विद्यार्थी वसतिगृहाला देण्यात आली. वरूड येथे गोरगरिबांच्या मुलांसाठी हे वसितगृह उभारण्यात येत आहे. याप्रसंगी गणेश टिपरे, ईश्वर टिपरे, हरिनारायण टिपरे, सुरेंद्र टिपरे आदी उपस्थित होते.

-----------

शेंदोळा खुर्द येथे युवकाला मारहाण

शेंदोळा खुर्द : गावातील दिलीप प्रकाश जाधव (२८) यांना नीलेश साव (३०), सचिन सुरेश साव (२४), रीतेश सुरेश साव (२८) नितीन सुरेश साव (२८) यांनी मारहाण केली. नीलेश साव हा रात्री दार ठोठावतो. त्याला समजविण्यासाठी गेलो असता, मारहाण करण्यात आली, अशी तक्रार तिवसा पोलिसांत दाखल करण्यात आली. तिवसा पोलिसांनी २३ फेब्रुवारीला गुन्हा नोंदविला.

---------

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

गुरुकुंज मोझरी : माहेरहून पैसे आणण्यासाठी नागपुरातील सीतानगर येथील सासरी ३२ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. तिवसा पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अ, ३४ अन्वये प्रीतम मनोहर लांजेवार, सुमीत मनोहर लांजेवार व दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------

बैरागड येथे महिलेला पतीची मारहाण

धारणी : तालुक्यातील बैरागड येथे काळमीबाई शेलुकर (४५) यांना पती बिसराम शेलुकर याने २३ फेब्रुवारी रोजी काठीने जबर मारहाण केली. त्याने मद्यपान केले होते. याप्रकरणी धारणी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

----------

क्रिकेटच्या मैदानावर बॅटने मारहाण

अचलपूर : येथील चौधरी मैदानात क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलेल्या वजाहत अली जामीन अली (रा. फरमानपुरा) या युवकाला तहजीम बिस्मिल्ला याने बाजूला हो असे म्हणत दगड मारला. नाजीम बिस्मिल्ला (दोन्ही रा. किल्ला) याने बॅटने मारून जखमी केले. अचलपूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.

---------

नांदगाव पंचायत समितीमधून दुचाकी लंपास

नांदगाव खंडेश्वर : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत नोकरीला असलेले लक्ष्मण कोंडिबा खांडरे (३७, रा. विकासनगर, नेर) यांची एमएच २९ एबी ७५५१ क्रमांकाची दुचाकी पंचायत समितीच्या आवारातून लंपास करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

--------

शिंगणापूर येथे मुलाची आईला मारहाण

दर्यापूर : तालुक्यातील शिंगणापूर येथे मद्याधीन मुलाने आईला लाकडी काठीने जबर मारहाण केली. रवि गणेश इंगळे (२२) नामक मुलाने घरात साठवलेली सात-आठ किलो तूर विकली व त्यातून मद्यपान केले. यातून वाद झाला. खोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-----------

बोराळा फाटा येथे दुचाकीस्वाराला धडक

खल्लार : नजीकच्या बोराळा फाटा येथे एमएच २७ बीई ६३३९ क्रमांकाच्या दुचाकीने सुधीर दत्तुसा गढवाले (४०, रा. उंबर्डा बाजार, ता. कारंजा लाड) यांच्या दुचाकीस्वार पुतण्याला धडक दिली. २० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. त्यावरून खल्लार पोलिसांनी सुभाष मिश्रा (रा. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------