शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी-सुल्तानी संकटांनी बळीराजा हतबल

By admin | Updated: September 23, 2015 00:26 IST

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे.

शासनाने सोडले वाऱ्यावर : लोकप्रतिनिधी करतात नौटंकीअचलपूर : श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमी, रक्षाबंधन उत्साहात आटोपले. अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा खचला आहे. सध्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरले आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे जलधारांनी स्वागत करणारा वरुणदेव रुसला आहे. परतीच्या पावसाने मनसोक्त हजेरी लावली नसल्याने किती पीक हाती येते? त्याला भाव काय मिळतो व त्यातून लावलेला खर्च तरी निघतोय का, याचाच विचार सध्या शेतकरी करीत आहेत. संकटाचा मुकाबला करणाऱ्या बळीराजाला आता त्याच्या कुटुंबाची चिंता सतावत आहे.सर्व सणांवर यंदा दुष्काळाचे सावट आहे. वास्तव परिस्थितीतही शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या सर्जा-राजाचा सण पोळा नुकताच साजरा केला. पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. मात्र यावर्षी पिकांची स्थिती बिकट असल्याने त्यांचा पोळा दारिद्र्यातच गेले. अचलपूर-परतवाड्यात अतिवृष्टी, वादळ, गारपीट अशी स्थिती मागील चार- पाच वर्षांपासून अचलपूर तालुल्यातील शेतकरी अनुभवत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: डबघाईस आला आहे.बाप्पांना साकडेसततच्या नापिकीने झालेल्या कर्जाला कंटाळून गेल्या १४ वर्षांत अचलपूर तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सन २००२ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुरुवात झाली होती. काही आत्महत्या शासनाने अपात्र ठरविल्या होत्या. अजूनही अस्मानी संकट घोंगावत आहे. शेतकरी दोन हात करीत लढाई लढत आहे. गणेश चतुर्थीला झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशीपासून पावसाने पुन्हा दडी मारली. गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहेत. गणेशोत्सवात पावसाने समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला. सर्वत्र दुष्काळाचे वातावरण असल्याने गणेशोत्सवात अपेक्षित उत्साह दिसत नाही. निसर्गाने मारले, राजकारण्यांनी दुष्काळाचे भांडवल करून स्वत:ची पोळी शेकत आहेत. शासनाने वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांचे लेकरु म्हणून मत मागणारे फिरकेनासे झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)