शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

अमरावती विद्यापीठाच्या २२ पासूनच्या परीक्षा पुन्हा स्थगित, कुलगुरुंचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 10:17 PM

Amravati University : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन विद्यापीठाने ठरविले होते.

ठळक मुद्देअमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी या प्रकारामुळे निराश झाले आहेत.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुरुवार, २२ ऑक्टोबरपासूनच्या नियोजित परीक्षा पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चौथ्यांदा परीक्षा स्थगितीचा प्रंसग विद्यापीठावर ओढवला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी या प्रकारामुळे निराश झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन विद्यापीठाने ठरविले होते. प्रारंभी १ ऑक्टोबर, नंतर १२ पुन्हा २० ऑक्टोबर अशा तीनदा परीक्षा विविध कारणांनी स्थगित करण्यात आल्या. मात्र, २२ ऑक्टोबरपासून नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येतील, असे परिपत्रक २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी काढले. त्यानुसार बुधवारी दिवसभर ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षेत येणा-या तांत्रिक अडचणी, समस्यांवर मंथन सुरूच होते. परंतु, ऑनलाईन परीक्षेसाठी नेमलेल्या नागपूर येथील ‘प्रोमार्क’ एजन्सीकडून त्याअनुषंगाने प्रतिसाद मिळाला नाही. 

परिणामी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी गुरुवारपासूनच्या नियोजित परीक्षा पुढील निर्णयापर्यंत स्थगित केल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत नव्याने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती आहे. वाणिज्य व व्यस्थापन, मानव्यविज्ञानशास्त्र, आंतरविद्याशाखा विद्याशाखीय अभ्यास आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चारही  विद्याशाखांच्या परीक्षांना फटका बसला आहे. उन्हाळी २०२० परीक्षेत १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, तांत्रिक समस्यांचे संकट कायम असल्याने विद्यापीठाला परीक्षा स्थगित करण्याचा प्रसंग ओढवला आहे. 

विद्यार्थीही वैतागले....कोरोना काळात घरी असलेल्या विद्यार्थ्यांनी जेमतेम उन्हाळी २०२० परीक्षेला सामोरे जाण्याची मानसिकता तयार केली. १ ऑक्टोबरपासून सुरळीत परीक्षा होणार, यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही आनंदीत असल्याचे चित्र होते. मात्र, परीक्षांच्या ‘तारीख पे तारीख’ने  विद्यार्थी वैतागले आहे. २० ऑक्टोबर रोजी ऑनलाईन परीक्षेत उडालेला गोंधळाने विद्यार्थी हतबल झाले आहे. तांत्रिक समस्या कधी सुटणार आणि परीक्षेपासून कधी मुक्त होऊ, या विवंचनेत विद्यार्थी आहेत.

परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी तांत्रिक समस्या कायम होत्या. परीक्षांच्या नियोजनाबाबत समितीचे गठन होईल. आता तांत्रिक समस्या दूर केल्यानंतरच परीक्षांचा तारीख जाहीर करू.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडेगबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती