शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जास्त मुली कोण पटवणार? आरोपींची मैत्री तुटली अन् अमरावतीतील अश्लील व्हिडिओचं रॅकेट आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:09 IST

अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपींबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

Amravati Crime: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा व्हिडीओ कांडाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याने हे कृत्य कोणत्याही गुन्हेगारी फायद्यासाठी किंवा क्रिमिनल अॅक्सेस साठी केले नसून केवळ स्वतःच्या विकृत अय्याशीसाठी केल्याचे अत्यंत संतापजनक निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपींनी पैज लावत मुलींचे शोषण केले. आतापर्यंत या प्रकरणात अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे.

परतवाडा येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण हे दोन मित्रांच्या विकृतीचा भयंकर परिणाम असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा मित्र उझैर खान यांच्यात जास्त मुलींना कोण जाळ्यात ओढणार? अशी पैज लागली होती. या विकृत स्पर्धेतूनच अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

पैजेतून सुरु झाली विकृती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान आणि उझैर यांच्यात तरुणींना मोहात पाडण्याची आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची स्पर्धा लागली होती. अयान मुलींसोबत अश्लील कृत्य करायचा आणि त्याचे व्हिडिओ पुरावा म्हणून उझैरला पाठवायचा. हळूहळू याचे रूपांतर एका भयानक विकृतीत झाले. हे नराधम केवळ व्हिडिओ बनवून थांबले नाहीत, तर त्यांनी ते ऑनलाइन अपलोड करून तरुणींना ब्लॅकमेलही करत होते.

मैत्रीत पडली ठिणगी अन् रॅकेटचा झाला पर्दाफाश

हे प्रकरण इतके दिवस कुणाला माहिती नव्हते होते, मात्र अयान आणि उझैर यांच्यात पैशांवरून वाद झाला. याच वादातून उझैरने अयानला धडा शिकवण्यासाठी त्याचे सर्व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या दोघांच्या भांडणामुळेच अखेर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.

मित्राची रूम घेतली भाड्याने; पोलिसांकडून मित्रालाही बेड्या

मुख्य मास्टरमाईंड अयान अहमद याने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अमरावती शहरात अयानचा एक मित्र काही तासांसाठी आपली भाड्याची खोली अयानला उपलब्ध करून देत होता. याच रूमवर अयान मुलींना घेऊन जायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. पोलिसांनी आता या रूम पार्टनर मित्रालाही ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

आरोपींचा आकडा ८ वर; मास्टरमाईंडसह साथीदार गजाआड

परतवाडा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अयान अहमद आणि उझैर खानसह एकूण ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये अयानच्या त्या मित्रांचाही समावेश आहे ज्यांनी जाणीवपूर्वक हे व्हिडिओ पसरवण्यास मदत केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आता प्रत्येक पीडित मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Sex Racket: Friendship Turns Sour, Exposes Shocking Video Crimes

Web Summary : Amravati's sex racket exposed a twisted competition between friends to exploit girls. The main accused filmed and blackmailed victims. A dispute led to exposure, arrests, and ongoing investigation to identify victims.
टॅग्स :Amravati Sexual Abuse Caseअमरावती लैंगिक शोषण प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ