शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी परत केली सेवाशुल्काची रक्कम

By admin | Updated: July 27, 2014 23:31 IST

शासनाच्या आम आदमी विमा योजनेत शाळांकडून सेवामूल्याच्या नावावर दुप्पट रक्कम घेतली जात असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम परत केली.

चांदूरबाजार : शासनाच्या आम आदमी विमा योजनेत शाळांकडून सेवामूल्याच्या नावावर दुप्पट रक्कम घेतली जात असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम परत केली.इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे सुरु केलेली आम आदमी विमा योजनेव्दारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कोणतीही जमीन नाही अथवा बागायती १ हेक्टर अथवा कोरडवाहू २ हेक्टरच्या आत शेतजमीन आहे. अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येतो. परंतु तालुक्यातील काही शाळांमध्ये या योजनेचे दुप्पट शुल्क घेऊन पिळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. परंतु स्थानिक सेतू केंद्रावरच या योजनेसाठी लागणारे २२ रुपयांच्या जागी ३० ते ३५ रुपये आकारत आहे. हा प्रकार शासनाच्या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून दुप्पट पैसे घेत असल्याची बाब उघड होताच काही शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पैसे परत करुन दिले. काही शिक्षकांनी या योजनेतून आपले अंग काढत या योजनेत विद्यार्थ्यांना मदत न करण्याचे ठरविले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना आता स्वत:लाच त्रास घ्यावा लागत असल्याने अनेक विद्यार्थी या योजनेपासून दूरच राहाणार आहे. मात्र या योजनेत शिक्षकांंचा सहभागाविषयी गटशिक्षणाधिकारी ईर्शादउल्ला खान यांना विचारणा केली असता या योजनेत सर्वात मोठा सहभाग व शिक्षकांचाच महत्त्वाचा असून त्यांनी या योजनेत लाभार्थी विद्यार्थ्यांना पूर्ण सहयोग करणे तसेच या योजनेतील त्रुटींची पूर्णत: करणे हे शिक्षकांचे काम आहे. परंतु काही शिक्षक या योजनेतून आपल्या मुख्याध्यापकाला जबाबदार धरत आहे. (शहर प्रतिनिधी)