शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम उदय अभियानांतर्गत अपंगांना साहित्य वाटप

By admin | Updated: May 16, 2016 00:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अचलपूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत भीम महोत्सव आयोजित केला होता.

कांडली येथे कार्यक्रम : अचलपूर तालुक्यातील २५ सरपंच, उपसरपंचांचा गौरव अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अचलपूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत भीम महोत्सव आयोजित केला होता. या उत्सवाच्या अनुषंगाने रविवारी अपंगांना साहित्य वाटप करून सरपंच, उपसरपंचांचा गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. बच्चू कडू, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, सभापती सोनाली देशमुख, महिला बाल कल्याण सभापती अरूणा गोरले, भारत थोरात, सरपंच सुषमा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला कांडली ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्ते बांधकाम, नाली बांधकामाचे लोकार्र्पणदेखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चात पालकमंत्र्यांच्या हस्ते अचलपूर तालुक्यातील २५ सरपंच आणि उपसरपंचांचा गौरव करण्यात आला. छत्रपती राजे संभाजी भोसले जन्मोत्सव याचवेळी परतवाडा येथे छत्रपती राजे संभाजी भोसले जन्मोत्सवानिमित्त आयोजित सदभावना रॅली तथा शेतकरी सन्मान परिषदेचे उदघाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. कडूंसह व्याख्याते संजीव सोनोने, प्रेमकुमार बोके, उपायुक्त रवींद्र ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकरे आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्यदायी योजना, शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात १०,६०० कृषी वीज पंपांना कनेक्श्न दिले, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकले. आ. बच्चू कडू यांनी यावेळी शेतकऱ्यांचे कष्ट मोजण्याची आवश्यकता व्यक्त करून शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी केली. उपस्थित इतर अतिथींनीदेखील समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. कृषी वीजपंपाचे वाटप यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)