शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचे खाते वाटप

By admin | Updated: November 8, 2014 00:44 IST

जिल्हा परिषदेच्या नवीन उपाध्यक्षांसह दोन सभापतींचे खाते वाटप शुक्रवार ७ नोहेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या नवीन उपाध्यक्षांसह दोन सभापतींचे खाते वाटप शुक्रवार ७ नोहेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या पदाधिकाऱ्यांचे खाते वाटपाबाबतचे धोरण सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सभेपूर्वीच ठरवून ही बाब सभेपर्यंत आपल्यापूरतीच मर्यादित ठेवली. केवळ नियमानुसार औचारिकता म्हणून ही सभा घेण्यात आली. या सभेत जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांनी उपाध्यक्ष व दोन सभापतींच्या खाते वाटपाचा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर मांडला. या प्रस्तावास सभसगृहात उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभेचे सचिव के. एम. अहमद यांनी या अध्यक्षांच्या सहमतीने खाते वाटप जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेल्या खाते वाटपाच्या चर्चावर पडदा पडला आहे.जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत . त्यानुसार अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे स्थायी आणि जलव्यवस्थापन समिती. उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांच्याकडे वित्त व आरोग्य समिती. सभापती गिरीश कराळे यांच्याकडे बांधकाम व शिक्षण समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. सभापती वृषाली विघे यांचेकडे महिला व बालकल्याण समिती, तर समाजकल्याण समितीची जबाबदारी सभापती सरिता मकेश्र्वर यांच्याकडे आणि कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याची धुरा सभापती अरूणा गोरले यांच्याकडे देण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच चार जिल्हा परिषद सभापतीची निवडणूक विधानसभेच्या धामधुमीत आटोपली. मात्र, याचवेळी निवडणुकीची आचासंहिता असल्यामुळे जिल्हा परिषदेतील नवीन शिलेदारांना यावेळी खातेवाटप होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या आहेत. आता कामकाजाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. खाते वाटपाच्या सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यक्रम अधिकारी के. एम. अहमद यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वऱ्हाड विचार मंच, जनसग्राम, प्रहार, रिपाइं, बसप आदी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)