शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच दशकानंतर अमरावती पंचायत समितीवर काँग्रेसची बाजी

By admin | Updated: March 15, 2017 00:02 IST

भाजपची जोरदार लाट अमरावती शहरात थोपविण्यात आ.यशोमती ठाकूर यांचा करिश्मा पुन्हा एकदा यशस्वी ठरला.

भाजपची थोपविली लाट : यशोमती ठाकुरांचा करिश्माअमरावती : भाजपची जोरदार लाट अमरावती शहरात थोपविण्यात आ.यशोमती ठाकूर यांचा करिश्मा पुन्हा एकदा यशस्वी ठरला. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती पंचायत समितीवर तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला सन्मानपूर्वक विराजमान करण्यात आ. यशोमतींचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच जिल्ह्यात काँग्रेसचा हा विजय लक्ष्यवेधी ठरला आहे. महानगराशी संलग्न अमरावती पंचायत समितीमध्ये भाजपची लाट थोपविण्यात आ. यशोमती ठाकूर यांना मिळालेले देदीप्यमान यश अधोरेखित करण्यासारखेच आहे. शहरात चौफेर उधळलेल्या भाजपच्या वारूला जिल्हा मुख्यालयाच्या पंचायत समितीत लगाम घातला गेला, तो यशोमतींमुळेच. पंचायत समिती निवडणुकीत पाच सदस्य निवडून आलेत तर मंगळवारी झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेसह प्रहारच्या प्रत्येकी एका सदस्याने पाठिंबा दिल्याने १० सदस्यांच्या सभागृहात कॉँग्रेसचे सात संख्याबळ झाले आहे. आ. यशोमती ठाकूर याचा दांडगा जनसंपर्क, आश्वासनांना प्रत्यक्ष कृतीची जोड यामुळे तिवसा मतदारसंघात जिल्हा परिषद गटांमध्ये ७ सदस्य निवडून आले होते तर अमरावती पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने २५ वर्षानंतर इतिहास घडविला आहे. आ. ठाकूर यांच्या झंझावाताने पुन्हा एकदा कॉँग्रेसचे येथे वर्चस्व निर्माण झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. धर्मनिरपेक्ष राजकारणाची मोहोर अमरावती पंचायत समिती सभापतीपदासाठी अल्पसंख्यक समाजाच्या वहिदाबी युसुफ शहा यांना उमेदवारी देऊन त्यांना बहुमताने निवडून आणित आमदार यशोमती ठाकूर यांनी धर्मनिरपेक्ष राजकारण पुन्हा एकदा अधोरेखित केले व हीच कॉँग्रेसची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी दोन सदस्यांचा कॉँग्रेसला पाठिंबा सभापती, उपसभापतीपदासाठी कॉँग्रेसला सात मते मिळाली. बाळासाहेब देशमुख उपसभापती विजयी झालेत. सेना, प्रहारच्या प्रत्येकी एका सदस्याने पाठिंबा दिल्याने विरोधी उमेदवाराला भाजपाचे एक व युवा स्वाभिमानची दोन मते मिळालीत. सर्वांचेच परिश्रम फळाला आले. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या पंचायत समितीवर मागील२५ वर्षांनंतर कॉँग्रेसने बाजी मारली. याचा मनस्वी आनंद आहे. - यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा