कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची मुदत बुधवारपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST2020-12-13T04:28:44+5:302020-12-13T04:28:44+5:30

बॉक्स मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश जानेवारीत सध्याच्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर महाविद्यालयनिहाय उपलब्ध जागांची प्रसिद्धी १२ जानेवारीला केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित ...

Admission deadline for agricultural courses is Wednesday | कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची मुदत बुधवारपर्यंत

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची मुदत बुधवारपर्यंत

बॉक्स

मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश जानेवारीत

सध्याच्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर महाविद्यालयनिहाय उपलब्ध जागांची प्रसिद्धी १२ जानेवारीला केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाकडे व्यक्तीश: प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याची मुदत १४ व १५ जानेवारी असेल. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर निवड यादी १६ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेशासाठी १७ व १८ जानेवारीची मुदत आहे. वर्ग सुरू होण्याची तारीख ११ जानेवारीला निश्चित केली आली.

बॉक्स

१५ जानेवारी दरम्यान फेरीरीचे प्रवेश पूर्ण होणार

अंतिम गुणवत्ता यादी २५ डिसेंबरला, तर पहिल्या फेरीची २७ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २८ व २९ डिसेंबरची मुदत आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी ३१ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १२ जानेवारीची मुदत आहे. तसेच तिसऱ्या फेरीची यादी ५ जानेवारीला होणार प्रसिद्ध आहे. प्रवेशासाठी ६ व ७ तारखेची मुदत आहे. प्रवेश फेरीचा तपशील ९ जानेवारीला उपलब्ध होणार आहे. ११ ते १५ जानेवारी दरम्यान प्रवेशाच्या फेरी पूर्ण केले जातील.

Web Title: Admission deadline for agricultural courses is Wednesday