महापालिकेत प्रशासकीय मानापमान !

By Admin | Updated: September 5, 2016 00:17 IST2016-09-05T00:17:12+5:302016-09-05T00:17:12+5:30

महापालिकेच्या आस्थापनेवरील दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर यंत्रणेत मानापमान नाट्य रंगले आहे.

Administrative municipality in municipality! | महापालिकेत प्रशासकीय मानापमान !

महापालिकेत प्रशासकीय मानापमान !

बोंद्रेंना कारणे दाखवा: उध्दट वर्तनाचा आरोप
अमरावती : महापालिकेच्या आस्थापनेवरील दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर यंत्रणेत मानापमान नाट्य रंगले आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात घडलेल्या या नाट्यानंतर आयुक्तांनी सहायक पशूशल्यचिकित्सकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तक्रारीनुसार, महापालिकेतील प्रभारी शिक्षणाधिकारी अमित डेंगरे प्रशासकीय कामानिमित्त अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या दालनात बसले होते. २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ ची वेळ होती. प्रशासकीय चर्चा सुरु असताना सहायक पशूशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे हे सुद्धा शेटे यांच्या दालनात दाखल झाले. शेटे यांच्या समक्ष बोंद्रे यांनी त्यांच्या विभागातील नादुरुस्त प्रिंटरबाबत डेंगरे यांना जाब विचारला. पशूशल्य विभागातील प्रिंटर नादुरुस्त झाल्याने अनेक कामे रखडल्याची तक्रार बोंद्रे यांनी नोंदविली. मात्र, ते प्रिंटर चांगलेच असल्याचा दावा डेंगरे यांनी केला. त्यावर बोंद्रे यांच्या संतापाचा कडेलोट झाला. ‘तुला जास्त समजते का?, तू मला सांगशिल का?’ अशा शब्दांत त्यांनी डेंगरे यांना फटकारले. अद्वातद्वा बोलत हातातील फाईल त्यांनी शेटे यांच्या टेबलवर संतापाने आपटली. बोंद्रे यांनी नवीन प्रिंटरची मागणी अतिरिक्त आयुक्तांकडे केली असता डेंगरे यांनी जुनेच प्रिंटर वापरण्यायोग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे बोंद्रेंचा आवाज अधिक चढला.

‘यू आर नॉट माय कॉम्पिटिटर’
२३ आॅगस्टची ती सायंकाळ मोजक्या अधिकारी आणि प्रत्यक्षदर्र्शींसाठी वादळी ठरली. बोंद्रे आणि डेंगरे यांच्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेत वाद आणि मानापमानाची जुगलबंदी रंगली. ‘महापालिकेत आता आलेला तू मला शिकवशील काय? यू आर नॉट माय कॉम्पिटिटर’, अशा शब्दांत बोंद्रे यांनी डेंगरे यांना सुनावले.

Web Title: Administrative municipality in municipality!