शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा हॉटस्पॉटसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची नोंद झालेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. या ठिकाणी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. येथे आढळलेल्या संक्रमितांपैकी काही यापूर्वीच्या संपर्कातील आहेत, तर काही मुंबई व पुणे आदी हॉटस्पॉटमधून आलेले आहेत. त्या व्यक्तींनी समोर येऊन आरोग्य तपासणी व सूचनांप्रमाणे क्वारंटाईन राहण्यासाठी आता लक्ष देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएकूण ४५, जिल्ह्यात सर्वात जास्त : जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांमध्ये चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या बडनेरामध्ये कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आता नवा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यात बुधवारी याविषयी चर्चा झाली. येथे आतापर्यंत ४५ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या याच भागात असल्याने कोरोनाची साखळी ‘बे्रक’ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे.
सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची नोंद झालेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. या ठिकाणी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. येथे आढळलेल्या संक्रमितांपैकी काही यापूर्वीच्या संपर्कातील आहेत, तर काही मुंबई व पुणे आदी हॉटस्पॉटमधून आलेले आहेत. त्या व्यक्तींनी समोर येऊन आरोग्य तपासणी व सूचनांप्रमाणे क्वारंटाईन राहण्यासाठी आता लक्ष देण्यात येणार आहे.
नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय आवागमनास बंदी घालण्यात आली आहे. या सर्व कंटेनमेंटमध्ये आशा व एएनएम यांच्या पथकांकडून सर्वे सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, मधुमेहसह अन्य आजार आहे का, कुठल्या आजाराची लक्षणे आहेत का, औषधे घेतली जात आहेत का, याविषयीदेखील विचारणा करण्यात येईल. त्याबाबत नोंद ठेवली जाणार असल्याचे असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. बरेच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने, काही लक्षणे आढळताच तातडीने स्वॅब घेण्यात येऊन उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महापालिका आयुक्तांसोबत याविषयी चर्चा झालेली आहे. पुन्हा बुधवारी सायंकाळी चर्चा करण्यात येणार आहे. येथील नागरिक व पदाधिकारी कोरोनाला पळवून लावण्याविषयी सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

जनता कर्फ्यूची नगरसेवकांद्वारे मागणी
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बडनेरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेला आहे. अंत्यत दाट लोकवस्ती असणाऱ्या या नगरासाठी ही गंभीर बाब आहे. येथील अधिकांश भाग हा झोपडपट्टीचा असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बडनेरात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू सक्तीने करण्याची मागणी येथील सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली. नागरिकांचीदेखील ही मागणी आहे. यावेळी नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंझाड, इमरान सईद, इशरत बानो मन्नान खाँ, गंगा अंभोरे, मोहम्मद साबीर, रुबिना तबस्सुम हारून अली आदी उपस्थित होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या