आरोपी पतीची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:05+5:302021-02-09T04:15:05+5:30

बाहेरच्या पानासाठी वरुड : टेंभूरखेडा येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीचा वायरने गळा आवळून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी पतीला न्यायालयीन ...

Accused husband sent to jail | आरोपी पतीची कारागृहात रवानगी

आरोपी पतीची कारागृहात रवानगी

बाहेरच्या पानासाठी

वरुड : टेंभूरखेडा येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीचा वायरने गळा आवळून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. परिणामी, त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. दीपक राजेंद्र जिचकार (२९, रा.सावंगी, ह.मु. पुसला) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलीस कोठडीदरम्यान दीपकने पत्नी अंकिता (२३, रा. सावंगी, ह.मु. टेंभूरखेडा) हिचा खून केल्याची कबुली दिली. त्याला ४ फेब्रुवारी रोजी रात्री पुसला येथून अटक करण्यात आली होती. विभक्त होण्याचा तिचा निर्णय मान्य नसल्याने गळा आवळला, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती वरूड पोलिसांनी ुदिली. फौजदारी न्यायालयाने आरोपीची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत, बीट जमादार सुनील अकोलकर, मनोज कळसकर, संदीप उल्हे करीत आहेत.

Web Title: Accused husband sent to jail