शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

अपघात ट्रकने, दुचाकींवर कारवाई, अवैध पार्किंग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

फोटो - दर्यापूर २८ एस दर्यापुरात आणखी बळी जाण्याची भीती, वाहतूक पोलिसांची थातूरमातूर कारवाई दर्यापूर : शहरातील गांधी चौकात ...

फोटो - दर्यापूर २८ एस

दर्यापुरात आणखी बळी जाण्याची भीती, वाहतूक पोलिसांची थातूरमातूर कारवाई

दर्यापूर : शहरातील गांधी चौकात नवविवाहितेचा ट्रकखाली चिरडून बुधवारी मृत्यू झाल्यानंतर शहरातील अनियंत्रित वाहतुकीवर सक्त कारवाई अपेक्षित होती. मात्र, गुरुवारी दिवसभरात काही दुचाकींवर कारवाई करीत वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी आटोपली. मोठ्या वाहनांचे अवैध पार्किंग शहरभरात कायम असल्याने आणखी बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

बुधवारी दुपारी गांधी चौकात अनियंत्रित वाहतुकीमुळे नवविवाहित महिलेचा बळी गेला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी जप्त केल्या. मात्र, रस्त्यावर वर्दळीच्या वेळी धावणाऱ्या मोठ्या वाहनांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्यापुरातील बस स्थानक चौक ते बाजार समितीपर्यंत काळी-पिवळी वाहनांचे अवैध पार्किंग असते. वाहतूक पोलिसांची बस स्थानक चौकात गस्त असते. परंतु, ते कुठलीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. खरेदी-विक्री संघासमोरील एका बाजूचा संपूर्ण रस्ता काळी-पिवळी वाहनांच्या अवैध पार्किंगने व्यापली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते.

----------

दोन महिन्यांपासून काम बंद

दर्यापूर शहरातील मुख्य मार्गाचे काँक्रीटीकरण होत आहे. मात्र, दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे काही ठिकाणाहून वळून एकाच बाजून ये-जा करणारी वाहने आलेली असतात. त्यात रस्ता दुभाजकासाठी मिळालेल्या जागेचा वापर करीत अवैध पार्किंग केले जाते. अवैध पार्किंग व अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या या वाहनांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

------------

अवैध पार्किंगमधील २५ दुचाकीवर कारवाई...

नवविवाहित रोहिणी काकड या बुधवारी अपघातात बळी पडताच पोलिसांनी सायंकाळी रस्त्यावर उभ्या असलेल्या २५ वाहनांवर कारवाई केली व त्यांना दंड देण्यात आला. काही दुचाकी पोलिसांनी ढकलतच ठाण्यात नेल्या. पोलिसांचा मोठा ताफा या कारवाईदरम्यान उपस्थित होता.

------------------

शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणत्याही प्रकारची पार्किंग नसल्याने त्या ठिकाणी वाहने उभी राहतात. अशा अवैध पार्किंगमधील वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल.

प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक, दर्यापूर

--------------

फोटो कॅप्शन :- तालुका खरेदी विक्रीसमोरील अवैध पार्किंग. येथे दररोज वाहतूककोंडी निर्माण होते.