शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषण झाल्यास मान्यताच रद्द

By admin | Updated: December 28, 2016 01:43 IST

शासन अनुदान घेऊन स्वयंसेवी संस्थांकडून आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. मात्र, आता आश्रमशाळांमध्ये

संस्थाचालकांना लगाम : अटी, शर्थीचे पालन करण्यासाठी कठोर पाऊल अमरावती : शासन अनुदान घेऊन स्वयंसेवी संस्थांकडून आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. मात्र, आता आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत्यू अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्यास मान्यताच रद्द केली जाईल, असे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे संस्थाचालकाच्या मनमानी कारभारावर अंकुश लावले जाणार आहे. आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. परंतु अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरू असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, मूलभूत अधिकारांकडे स्वयंसेवी संस्था दुर्लक्ष करतात, अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे संस्था चालकांच्या मनमानीे कारभारावर अंकुश लावण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून अटी, शर्थीचे पालन संस्थांनी करावे, यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत्यू किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्यास अशा आश्रमशाळांची थेट मान्यता रद्द केली जाणार आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा न राखणे, पुरेशी विद्यार्थी नसणे, निकृष्ट भोजन व्यवस्था, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी बाबीकडे स्वयंसेवी संस्थाचे दुर्लक्ष राहते. अनुदान लाटण्यासाठी आश्रमशाळा चालविणे हा स्वयंसेवी संस्थाचा हेतू असल्याने याला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणे विद्यार्थ्यांचे मृत्यू, बलात्कार, लैंगिक अत्याचार, अपघात घडतात. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जात आहेत. या आश्रमशाळांत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या तुलनेत स्वयंसेवी संस्थांना अनुदान दिले जाते. मात्र संस्थाचालक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करुन केवळ अनुदान हडपण्यासाठी खटाटोप चालवितात.