शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात बाजारातून अट्टल गुन्हेगाराचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

आपण केलेला गुन्हा उघड झाल्याचे बघून  दोन अपहरणकर्त्यांपैकी एकाने दगड गिळून, तर दुसऱ्याने हातातील हातकडीने आपल्या कपाळावर मारून घेत स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे कपाळ फोडून घेणाऱ्या आरोपीवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ज्याचे अपहरण झाले तो आणि अपहरणकर्ते असे तिघेही अचलपूरचेच आहेत. 

ठळक मुद्देअपहरणकर्ते सीसीटीव्हीत कैद, अपहरण झालेल्याच्या शोधात पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक आठवडी बाजारातून अचलपूरच्या एका अट्टल गुन्हेगाराचे अपहरण झाले आहे. जवळपास तीस दिवसांपूर्वी हे अपहरण दोन अपहरणकर्त्यांनी केले. अपहरणकर्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ज्याचे अपहरण केले गेले, त्याचा शोध अचलपूर व परतवाडा पोलीस घेत आहेत. प्रकरण अतिसंवेदनशील बनले असून,  गंभीर वळणावर पोहोचले आहे. आपण केलेला गुन्हा उघड झाल्याचे बघून  दोन अपहरणकर्त्यांपैकी एकाने दगड गिळून, तर दुसऱ्याने हातातील हातकडीने आपल्या कपाळावर मारून घेत स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. स्वत:चे कपाळ फोडून घेणाऱ्या आरोपीवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ज्याचे अपहरण झाले तो आणि अपहरणकर्ते असे तिघेही अचलपूरचेच आहेत. अपहरणाच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे तक्रार दाखल आहे. पोलिसांनी भादंविचे ३६४ अन्वये  गुन्हा नोंदविला. यातील एका आरोपीला यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने, तर दुसऱ्या आरोपीस अचलपूर पोलिसांनी दरोडा, लुटमारीच्या घटनेत अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.अपहरणापूर्वी दरोडाअपहरण करण्यापूर्वी या दोन्ही आरोपींनी परतवाडा-बैतुल रोडवरील द्वारका बार व रेस्टॉरन्ट येथे ३ डिसेंबरला मॅनेजरसोबत बिलावरून वाद घातला. चाकूने व्यवस्थापकाच्या मानेवर वार करून लुटमार, मारहाण करीत काऊंटरमधून सहा हजार रुपये जबरीने चोरून नेले होते. त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३९४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.  गुन्हे शाखा पथकाने ७ डिसेंबरला सचिन भामोरे (२३, रा. चावलमंडी, अचलपूर) याला अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचा फरार साथीदार सागर सोनोने (३०) यास देवडी परिसरातून २७ डिसेंबरला अचलपूर पोलिसांनी अटक करुन परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. अपहरणकर्त्यांवर गंभीर गुन्हेअपहरणकर्ते आणि ज्याचे अपहरण झाले, त्यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सागर सोनोने (रा. माळवेशपूरा, अचलपूर) याच्याविरुद्ध अकोला व अमरावती जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अपहरण व चोरी प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. परतवाड्याच्या आठवडी बाजारातून अचलपूरच्या अट्टल गुन्हेगाराचे अपहरण करण्यामागचा उद्देश आणि ज्याचे अपहरण केले, तो कुठे आणि कुठल्या स्थितीत आहे,  याविषयीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस