शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या कृषिपंपांचे सहा महिन्यांचे वीज देयक माफ

By admin | Updated: May 9, 2014 23:53 IST

फेब्रुवारी व मार्च या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पीक व फळबागांचे नुकसान झालेल्या आपाद्ग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विशेष पॅकेजव्दारे कृषिपंपांच्या ६ महिन्यांच्या वीज बिलात सूट देण्यात...

संजय जेवडे - नांदगाव खंडेश्वर

फेब्रुवारी व मार्च या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पीक व फळबागांचे नुकसान झालेल्या आपाद्ग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विशेष पॅकेजव्दारे कृषिपंपांच्या ६ महिन्यांच्या वीज बिलात सूट देण्यात येणार आहे. या बाधित शेतकर्‍यांनी जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज बिल देयके राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने हालचाली सुरु असून बाधित शेतकर्‍यांचा महसूल यादीतील नावे व त्यांचा वीजग्राहक क्रमांक व जानेवारी ते मार्चचे वीज देयकाची रक्कम याबाबत वीज कंपनीने माहिती संकलीत केली आहे. या माहितीच्या आधारे शासनाचे सवलतीचा लाभ वीज देयकात शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. सहायक अभियंता वीज वितरण कंपनी उपविभाग नांदगाव खंडेश्वर या कार्यालयाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ८५ गावे येत असून तीन हजार ७५२ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. तसेच बडनेरा कार्यालयाअंतर्गत ७६ गावांचा समावेश असून सुमारे ४ हजारांच्या वर कृषीपंपधारक शेतकरी आहेत. या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची यादी महसूल विभागाकडून प्राप्त करुन वीज वितरण कंपनीने या शेतकर्‍यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या बिलात सवलतीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १४८ गावांतील १३ हजार ६०४ शेतकर्‍यांच्या शेतातील पिके व फळबागांतील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या तालुक्यात ५ हजार ३८६ हेक्टर हरभरा, ४ हजार २४६ हेक्टर गहू, ५९८ हेक्टर संत्रा, २९ हेक्टर लिंबू व ३४० हेक्टर भाजीपाला, तीळ व मका आदी पिके ५० टक्क्याचेवर नुकसान झाले होते. या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विशेष पॅकेजव्दारे जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत कृषिपंपाच्या वीज देयकात सूट देण्यात येणार आहे. शासनाने शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या हिताच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.