५१ जमादार झाले एएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST2021-07-20T04:10:57+5:302021-07-20T04:10:57+5:30

अमरावती : सेवाज्येष्ठतेनुसार शहर पोलीस आयुक्तालयातील १४१ पोलीस शिपाई, ९९ पोलीस नाईक तर ५१ पोलीस ...

51 Jamadars became ASIs | ५१ जमादार झाले एएसआय

५१ जमादार झाले एएसआय

अमरावती : सेवाज्येष्ठतेनुसार शहर पोलीस आयुक्तालयातील १४१ पोलीस शिपाई, ९९ पोलीस नाईक तर ५१ पोलीस हवालदारांना तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी १९ जुलै रोजी हे आदेश काढले असून, या पदोन्नतीमुळे पोलीस वर्तुळात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शासन निर्णयानुसार, २५ मे २००४ रोजीच्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने १४१ पोलीस शिपाई पदोन्नतीतून पोलीस नाईक बनले आहे. त्याचप्रमाणे ९९ पोलीस नाईक हे पदोन्नतीतून पोलीस हवालदार झाले तर, ५१ पोलीस हवालदार पदोन्नतीतून सहायक पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पदोन्नती मिळेल, या आशेने पोलीस कर्मचारी प्रतीक्षेत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली असून, पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे अनेकांना आनंद झाला आहे.

Web Title: 51 Jamadars became ASIs