In 502 projects in West Vidarbha, 68.20 percent water stored | पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

संदीप मानकर/अमरावती : गेल्या दोन आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक तथा दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ  झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, १२ सेंमीने ११ दारे उघडण्यात आली आहेत. 


यवतमाळ जिल्ह्यतील बेंबळा प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला असून, २५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. २२ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६८.२० टक्के पाणीसाठा असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी काही प्रकल्पांत अद्यापही अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. परतीच्या पावसात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७५.९१ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४९.७२ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात  सर्वात कमी १३.९१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३४.३३ टक्के, वान ९६.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४६.४४ टक्के, पेनटाकळी ९७.१० टक्के, खडकपूर्णा ४९.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. वान प्रकल्पाचे १५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली आहेत. ४६९ लघु प्रकल्पांचाही पाणीसाठा वाढत असून ५४.७० टक्के पाणीसाठा साचला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा असून आजचा  उपयुक्त पाणीसाठा हा २१६४.७५ दलघमी आहे. 


२४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७४.१४ टक्के पाणीसाठा
अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा साचला आहे. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के,  पूर्णा प्रकल्पात ९२.७९ टक्के, सपन ९६.२७ टक्के  पाणीसाठा साचला असून, जिल्ह्यातील चारही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९९.१६ टक्के  पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५३.०६ टक्के, वाघाडी ८४.४२  टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ६१.८७ टक्के, मोेर्णा ५१.०६ टक्के, घुंगशी बॅरेज २.०८ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ३१ टक्के, सोनल ५२.६० टक्के, एकबुर्जी ५४.८७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ७३.१४  टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी ९८.१३  टक्के पाणीसाठा साचला आहे.

Web Title: In 502 projects in West Vidarbha, 68.20 percent water stored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.