शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ५० वाघांचा मृत्यू

By admin | Updated: November 4, 2014 22:32 IST

वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह

महाराष्ट्रातील चार वाघांचा समावेश : नऊ घटनांत कातडी जप्तसुरेश सवळे - चांदूरबाजारवाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह इतर अवयव जप्त करण्यात आले. त्यातील तीन घटना महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडे वारीनुसार २०१४ मध्ये आॅक्टोबर अखेरपर्यंत ५० वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. सर्वाधिक १२ वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला आहे. त्या खालोखाल तामिळनाडूत ९, उत्तराखंडमध्ये ६, आसाममध्ये ५, महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये प्रत्येकी ४ वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वर्षभरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर रेंजमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण तपासात आहे.२४ जून आणि १९ जुलै रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात एका वाघाचे अस्तित्व संपुष्टात आले. कर्नाटकमधील सर्वाधिक १५ आणि महाराष्ट्रातील १० वाघांची संख्या घटली. वाघांची शिकार आणि कातडीसह अवयवांची तस्करी ही गंभीर समस्या बनली आहे. यावर्षी राज्यात आतापर्यंत तीन ठिकाणांहून वाघांची कातडी जप्त करण्यात आली. १३ आणि १७ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातून, २७ जुलैला भंडारा जिल्ह्यातून ही कातडी जप्त करण्यात आली. वाघांची शिकार करुन कातडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. स्थानिकांना वाघाच्या कातडीची किंमत दहा-वीस हजार रुपये मिळालग तरीही पुरेशी असते. पण आंरराष्ट्रीय बाजारपेठेत याच कातडीची मोठी रक्कम मिळू शकते. त्यामुळेच बडे तस्कर या व्यवसायात गुंतले आहेत. चीन हा वाघांच्या अवयवांचा प्रमुख खरेदीदार देश आहे. कातडी ही वैभवाचे चिन्ह म्हणून तर इतर अवयव हे औषधी गुणधर्मासाठी खरेदी केले जातात, असे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले. कायद्याचे उल्लंघन करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांना भरपूर मागणी आणि प्रचंड पैसा मिळत असल्याने वन्य प्राण्यांची सर्रास शिकार होत आहे. वन विभागाच्यावतीने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या ५० वाघांचा आतापर्यंत मृत्यू झाला त्यापैकी ४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अहवालात म्हटले आहे.