आरोग्य सुविधांसाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:01:03+5:30

आरोग्य केंद्रातील कामकाज, दवाखान्यातील आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता व साफसफाई, प्रभागांमधील धूरळणी-फवारणी आदींबाबत त्यांनी सूचना केल्या. महापालिकेची सोळाही आरोग्य केंद्रे नियमित सुरू राहावीत. ओपीडीची सकाळ व सायंकाळची वेळ, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाइल नंबर नागरिकांपर्यंत पोहोचवा.

50 lakh fund for health facilities | आरोग्य सुविधांसाठी ५० लाखांचा निधी

आरोग्य सुविधांसाठी ५० लाखांचा निधी

Next
ठळक मुद्देसुलभा खोडके : १६ ही आरोग्य केंद्र नियमित सुरु ठेवण्याच्या सूचना

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी आसीर कॉलनीतील महापालिकेच्या बहुप्रतीक्षित आरोग्य केंद्राचा वापर करावा. येथे आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी विकास निधीतून ५० लाखांचा निधी आयुक्तांकडे हस्तांतरित करण्यासाठी डीपीसीला पत्र देणार असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी आयुक्तांसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगितले.
महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आमदार खोडके यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी चर्चा केली. आरोग्य केंद्रातील कामकाज, दवाखान्यातील आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता व साफसफाई, प्रभागांमधील धूरळणी-फवारणी आदींबाबत त्यांनी सूचना केल्या. महापालिकेची सोळाही आरोग्य केंद्रे नियमित सुरू राहावीत. ओपीडीची सकाळ व सायंकाळची वेळ, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाइल नंबर नागरिकांपर्यंत पोहोचवा. दवाखाने सुरू असल्याची खातरजमा करण्यासाठी झोन अधिकाऱ्यांना दवाखान्याला भेट देण्याची सूचना आ. खोडके यांनी केली. बैठकीला आयुक्त प्रशांत रोडे, एमओएच विशाल काळे, सहायक आयुक्त मुख्यालय नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त योगेश पिठेंसह स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांनी रोज सायंकाळी अहवाल घ्यावा
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये सॅनिटायझर फवारणी, नियमित साफसफाई, कचरा संकलन व नाल्यांची सफाई वेळोवेळी करण्यात यावी. स्वच्छता कर्मचाºयांना सुरक्षिततेबाबत सुविधा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांना कुठल्या अडचणी असल्यास, याबाबत अधिनस्थ अधिकाºयांनी त्याची नोंद घ्यावी व या सर्व बाबींचा आयुक्तांनी सायंकाळी दूरध्वनीद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नियमित आढावा घ्यावा, अशी सूचना आ. खोडके यांनी केली.

Web Title: 50 lakh fund for health facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य