शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील ४८९ औषध परवाने रद्द

By admin | Updated: June 16, 2014 22:11 IST

अमरावती विभागातील तब्बल ४८९ औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

अकोला : औषधांची खरेदी आणि विक्री यामध्ये तफावत आढळल्याने औषधी दुकानावर फार्मासिस्ट गैरहजर राहणे तसेच परवाने प्रकाशित न करण्याच्या कारणावरून अमरावती विभागातील तब्बल ४८९ औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. २0१३ ते २0१४ या एका वर्षाच्या कालावधीत अमरावती विभागातील ४ हजार १४७ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४८९ औषधी दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावती विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या पाचही जिल्हय़ातील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी मागील एका वर्षाच्या कालावधीत औषधी दुकानांच्या तपासण्या केल्या असून, या तपासणीमध्ये विविध दोष आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांच्याकडून औषध दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्हय़ात गत एका वर्षात ४ हजार १४७ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये औषधी दुकानात फार्मासिस्ट हजर नसणे, औषधांची विक्री केल्यानंतर त्याचे देयक न बनविने, वर्गीकृत औषधांची देयके सादर न करणे, मागितलेले दस्तावेज सादर न करणे, औषधी दुकानाचा परवाना ज्यांच्या नावे आहे ते प्रकाशित न करणे, औषधी दुकानांमध्ये विक्री देयक पुस्तक नसणे आणि खरेदी केलेल्या औषधांची विक्री केलेल्या औषधांसोबत ताळमेळ न बसल्याचे तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे या औषधी दुकानांवर कारवाई करण्याचे अमरावती विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रस्तावित केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबई येथील आयुक्त महेश झगडे यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ामधील तब्बल ४८९ औषधी परवाने रद्द केले आहेत. यासोबतच काही परवाने निलंबित करण्यात आले असून, त्यांनी हा ताळमेळ सादर केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी दिली. ** फार्मासिस्टच्या २१२ केसेस एमएसपीसीकडे राज्यातील २१२ फार्मासिस्टने व्यवसायामध्ये गैरवर्तणूक केल्याचे प्राथमिक स्तरावर आढळून आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने २१२ फार्मासिस्टवर कारवाई करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे सादर केला आहे. महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलला या फार्मासिस्टला नोटीस बजावणे तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे अधिकार असून, ही कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे.