शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

३८ पोलिसांना कारणे दाखवा नोटीस असमाधानकारक कामगिरी

By admin | Updated: May 9, 2014 23:45 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण शाखा व दोन पोलीस ठाण्यातील डिटेक्शन पथकात कार्यरत ३८ कर्मचार्‍यांच्या कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करीत या कर्मचार्‍यांना पोलीस उपायुक्तांनी कारणे....

पाच दिवसांचा अल्टिमेटम

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण शाखा व दोन पोलीस ठाण्यातील डिटेक्शन पथकात कार्यरत ३८ कर्मचार्‍यांच्या कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करीत या कर्मचार्‍यांना पोलीस उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. कर्मचार्‍यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या, जबरी चोर्‍या, घरफोड्या तसेच दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात डिटेक्शन पथक बनविण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी व गुन्हे शाखेचे कर्मचारी शहरात गस्त करीत असतानाही या घटना वाढत असल्याने काही कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. गुन्हे शाखेत एकूण ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २१ आणि राजापेठ व शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील डिटेक्शन पथकात कार्यरत १७ कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले. या कर्मचार्‍यांना गुरुवारी पोलीस उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. कर्मचार्‍यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पाच दिवसांचा वेळ दिला आहे. कर्मचार्‍यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास वेतनवाढ १ वर्षासाठी रोखण्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.