शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

३५४ गावांत प्रकाशाच्या वाटा खडतर !

By admin | Updated: September 30, 2015 00:22 IST

एकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे

तांत्रिकतेत अडकल्या वीज जोडण्या : लोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीएकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे. संपूर्ण संगणकीकरण आणि ‘डिजिटल व्हिलेज’ची संकल्पना आकाराला येत असताना जिल्ह्यातील ३५४ गावांत अद्यापही प्रकाश पोहोचलेला नाही. कधी वनविभागाच्या जाचक अटींमुळे तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे या गावांच्या ‘प्रकाशवाटा’ खडतर बनल्या आहेत. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सन २०११ च्या आकडेवारीनुसार १९९७ गावे आहेत. यात ४१५ स्वतंत्र ग्रामपंचायती व ४२८ गावे आहेत. यात ४१५ स्वतंत्र ग्रामपंचायती व ४२८ गट ग्रामपंचायती आहेत. १९९७ पैकी १६४३ गावांमध्ये वीजजोडणी पोहोचली आहे. ही आकडेवारी सन २०१३-१४ ची असून यंदा त्यात काही अंशी सुधारणा झाली असावी. मात्र, तब्बल ३५४ गावांचे विद्युतीकरण न झाल्याने या गावातील लोक अद्यापही संगणक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंपासून कोसो दूर आहेत. विद्युतीकरण नसल्याने सिंचनासाठी आवश्यक व्यवस्था कार्यान्वित झाली नाही. मोटरपंप चालविण्यासाठी वीजच नसल्याने येथील शेतकरी प्रगत आणि उपयोगी व्यवस्थेपासून अजूनही लांब आहेत. आकडेवारी खरी कुणाची ? अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे प्रसिध्द जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनामध्ये प्रकाशित आकडेवारीवरुन जिल्ह्यातील ३५४ गावांत विद्युतीकरण झाले नाही, हे स्पष्ट होते. मात्र, महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही बाब नाकारली आहे. मेळघाटातील ३९ गावांमध्येच फक्त पारंपरिक वीज पोहोचलेली नाही, अशी माहिती महावितरणने दिली आहे. मेळघाटातील ३९ गावे वगळता जिल्ह्यातील उर्वरित गावात वीज पोहोचल्याचा दावा महावितरणकडून होत आहे. अशा स्थितीत ‘अर्थ व सांख्यिकी’च्या माहितीवर विश्वास ठेवावा की महावितरणचा दावा खरा म्हणावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थ, सांख्यिकी संचालनालयाने विद्युतीकरण न केलेल्या गावांबाबत प्रकाशित केलेली माहिती सुसंगत नाही. मेळघाटातील ३९ गावे वगळता संपूर्ण जिल्ह्यात वीज पोहोचली आहे. शहरामध्ये अनेक छोटी-छोटी गावे समाविष्ट आहेत. मात्र, येथील ग्राहकांना शहरातील ग्राहक म्हणून वीजपुरवठा दिला जातो. याशिवाय नांदगाव खंडेश्वर गावात ५ गावे आहेत. मात्र, आमच्या रेकॉर्डमध्ये नांदगाव खंडेश्वर या एकाच गावाची नोंद आहे. त्यामुळे हा आकडा फुगला आहे. - दिलीप मोहोड,कार्यकारी अभियंता, महावितरण.