शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या अपूर्ण विहिरींसाठी २५ टक्के अग्रीम रक्कम

By admin | Updated: May 3, 2015 00:15 IST

मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत,

दिलासा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंत कामे करावीतअमरावती : मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार आहे. सदर शेतकऱ्यांनी ३० मे पर्यंत कामे पूर्ण करावी. यासाठी लाभार्थींना रक्कम वाटपासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. मग्रारोहयोअंतर्गत जिल्हाभरात सध्या अपूर्ण व नवीन परंतु यापूर्वी रद्द झालेल्या विहिरींना शासनाने मंजुरी दिल्याने रोहयोअंतर्गत ही कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विहिरी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. अशात जिल्ह्याभरात मग्रारोहयोच्या अपूर्ण विहिरींची संख्याही बरीच आहे. त्यामुळे ही कामे शेतकऱ्यांनी गतीने करावीत. यामध्ये २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे. ३० एप्रिल रोजी ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करुन नवीन कामाची मागणी नोंदवून मजुरांना कामे लगेच उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. अशा परिस्थितीत मजुरांच्या कामाची वाढती मागणी लक्षात घेता अंदाजपत्रक तयार केले जात आहे. यासाठी वर्ष २०१५-१६ साठी जिल्ह्याचा लेबर बजेटचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला. जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या ५ किलोमीटर परिसरात मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे,असे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत.