शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:01 IST

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तरुणांचा मोठा जमाव जमला असून, पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. काही प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकऱ्यांची संख्या पाच ते सहाच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी रक्ताने माखलेली एक दुचाकी घटनास्थळाहूून जप्त केली आहे. या घटनेला जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे सांगण्यात आले. 

ठळक मुद्देफ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तणाव, आरोपींची धरपकड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महादेवखोरीतील वरुणनगरात २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. जुने वैमनस्य व क्षुल्लक वादातून बुधवारी दुपारी ४.३०  च्या सुमारास ही घटना घडली. प्रणय मधुकर सातनुरकर (२२, रा. महादेवखोरी) असे मृताचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सूत्रांनुसार, प्रणयवर दोन ते तीन युवकांनी चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. यात त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. परिणामी, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तरुणांचा मोठा जमाव जमला असून, पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. काही प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकऱ्यांची संख्या पाच ते सहाच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी रक्ताने माखलेली एक दुचाकी घटनास्थळाहूून जप्त केली आहे. या घटनेला जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करण्यासोबतच आरोपींना अटक करण्यासाठी तातडीने सूत्रे हलवून पथके गठित केल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली.

गँगवारमधून हत्या?प्राथमिक माहितीनुसार, महादेवखोरी व परिसरात ‘दादागिरी’ करणाऱ्या दोन टोळ्या आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांच्यात वाद होत असतात. काही तरुणांचा समावेश असलेली एक गँग दुसऱ्या गँगमधील तरुणांशी वाद करण्याकरिता जात असताना प्रणयचा बळी गेल्याचे सांगण्यात आले. 

दीड महिन्यात तिसरा खूनजुन्या वादातून दारू पिताना झालेल्या शाब्दिक वादातून जेवडनगरातील ४५ वर्षीय तडीपार गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.  मारेकऱ्यांनी दगड डोक्यात घातल्याने घटनास्थळी रक्ताने माखलेला मृतदेह पडून होता. ती घटना ४ जूनला छत्री तलावाजवळील जंगल परिसरात घडली होती. १ जुलै रोजी सायंकाळी हमालपुरा येथे ३२ वर्षीय तरुणावर चाकूने वार करण्यात आले. उपचारादरम्यान आकाश वलन (३२, रा. आदिवासी कॉलनी) याचा मृत्यू झाला. त्या घटनेला २० दिवस होत नाही तोच बुधवारी पुन्हा एका तरुणाच्या हत्येची घटना महादेवखोरी परिरसरात उघड झाली. विशेष म्हणजे, दगावलेले तिघेही तरुण आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी