शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले

By admin | Updated: October 14, 2015 00:18 IST

राज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची...

वनसंपदा धोक्यात : चराईमुळे होते वनौषधी नष्टमोहन राऊत अमरावतीराज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस रेकॉर्डमधून बाहेर आली आहे़ आम्हाला न्याय हवा, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी केली आहे़जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्र वगळता अमरावती वनविभागात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे़ वडाळी, मोर्शी, चांदूररेल्वे, परतवाडा व वरूड हे तालुके या क्षेत्रात आहेत़ मौल्यवान सागवान, खेर, साजड, अंजन, सालई, अन्नपूर्णा तसेच वनौषधी म्हणून बीबा, चारोळी, व अनेक वनऔषधी आहेत़ २०० प्रकारच्या पक्षाच्या प्रजाती असून वड, पिंपळ , उंबर, यावर हे पक्षी वास्तव्य करतात़ परंतू आज या पक्षांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे़चारईत वनऔषधी होतेय नष्टमागील अनेक वर्षा पासून या वनक्षेत्रात चराई चे प्रकार वाढले आहेत़ चराई होत असल्यामुळे नवीन वनस्पती उगवनीचे प्रमाण पुर्णत: थांबले आहेत़ या जंगलातील वनसंपदा धोक्यात आली आहे़ मारर्व्हेल, गोंडवेल, मोतीतुरा अशा प्रकारच्या गवताच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत़ या जाती वाचविण्यासाठी प्रशासनाने आता वरिष्ठ स्तरावर पावले उचलणे गरजेचे आहे़ अन्यथा दुर्मिळ वनौषधी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.वनकर्मचारी व अधिकारी अडचणीत या जंगलाचे सरंक्षण करीत असतांना मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यात अनेकदा संघर्षाचे प्रकार घडले आहे़ यात वनकर्मचारी व अधिकारी यांच्यावर अधीक हल्ले झाले असल्याची माहिती पोलीस दप्तरी आहेत़या प्रशासकीय यंत्रणेलाच धारेवर धरण्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे़जमा बंदी क्षेत्राचे कसे होणार रक्षणराज्य शासनाने ४८ वनविभागात चराई जमाबंदी चे आदेश ६ मे २००८ रोजी दिलेत अमरावती जिल्ह्यातील पश्चिम मेळघाट, पूर्व मेळघाट व अमरावती वनविभागाचा समावेश आहे़ या भागातील चराई थांबणे गरजेचे आहे़ संबधीत भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना जीव मुठीत घेवून रक्षण करण्याची पाळी आली आहे़आम्हाला कधी मिळणार न्याय?मागील अनेक पिढ्यांपासून मेंढ्या पाळणे आमचा व्यवसाय आहे़ त्यामुळे संसाराचा गाडा चालतोय आम्ही कोणत्याही वनक्षेत्रात मेंढ्या चारण्याचे काम करीत नसतांना आमच्यावर अनेक खोटे आरोप केल्या जाते़ खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होतो़ आम्ही जायचे तरी कुठे, आम्हाला कधी न्याय मिळणार असा सवाल अनेक मेंढपाळांनी निर्माण केला आहे़