शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील दहा प्रकल्पांसाठी २१०० हेक्टरचे भूसंपादन शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:47 IST

पश्चिम विदर्भातील अनुशेषांतर्गत व अनुशेषबाह्य अशा एकूण १० मध्यम प्रकल्पांकरिता २१३४.९३ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. सदर भूसंपादन प्रक्रिया तातडीने झाल्यास प्रकल्पांच्या उर्वरित कामांना गती मिळणार आहे. यामध्ये अनुशेषांतर्गत आठ प्रकल्प असून, अनुशेषबाह्य दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

- संदीप मानकर

अमरावती : पश्चिम विदर्भातील अनुशेषांतर्गत व अनुशेषबाह्य अशा एकूण १० मध्यम प्रकल्पांकरिता २१३४.९३ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. सदर भूसंपादन प्रक्रिया तातडीने झाल्यास प्रकल्पांच्या उर्वरित कामांना गती मिळणार आहे. यामध्ये अनुशेषांतर्गत आठ प्रकल्प असून, अनुशेषबाह्य दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

विभागातील मध्यम प्रकल्पांकरिता ४५१६.६७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता होती. त्यापैकी सरळ सेवा खरेदीने व प्रक्रियेद्वारे ३८५७.९१ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. ६५८.७६ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. यामध्ये ३७२.७६ हेक्टरचा प्रस्ताव अद्याप मंजुरीकरिता पाठविण्यात आला नसल्याची बाब पुढे आली आहे. अनुशेषबाह्य मध्यम प्रकल्पाकरिता ३८१७.४५ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता होती. त्यापैकी २३४१.२८ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. यामध्ये २५६.०६ हेक्टरचा प्रस्ताव अद्याप मंजुरीकरिता पाठविण्यात आली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्याकारणाने सदर १० मध्यम प्रकल्प उर्वरित अनेक कामे तसेच कालव्यांचे कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याकरिता भूसंपादन होणेसुद्धा गरजेचे असून, त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने व भूसंपादन विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पण त्यांचे कालवे किंवा पाइप वितरण प्रणालीची कामे प्रलंबित आहेत.

तीन जिल्ह्यांतील दहा प्रकल्पांचा समावेशभूसंपादनामध्ये अनुशेषांतर्गत असलेले अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज,  वासनी, बोर्डी नाला, गर्गा, पंढरी प्रकल्पांचा समावेश आहे. अकोला  जिल्ह्यातील घुंगशी, काटेपूर्णा बॅरेज, उमा आदी प्रकल्पांचा समावेश आहे. अनुशेषबाह्य यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा बॅरेज, टाकळी डोलारी प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. 

प्रकल्पांची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. निधीची जसजशी तरतूद करण्यात येते, त्यानुसार भूसंपादन करण्यात येते. लवकरच अनेक प्रकल्प पूर्ण होणार आहेत. - रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती