शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूचे 201 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १६७० डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. यामध्ये महानगरात ६ आणि १३ तालुक्यात १९५ डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील डेंग्यूचे रुग्णांचा हा आकडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत १६७० रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०१ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले, तर डेंग्यू संशयित नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाची उपाययोजना करताना तारांबळ उडाली आहे.जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १६७० डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. यामध्ये महानगरात ६ आणि १३ तालुक्यात १९५ डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील डेंग्यूचे रुग्णांचा हा आकडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसामुळे सर्वच भागात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांत वाढ झालेली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेविकांद्वारा ग्रामीण भागात व शहरी आरोग्य केंद्रनिहाय, वाॅर्डनिहाय, घरोघरी पाहणी केली जात आहे. डास उत्पत्तीचे स्थान टेमिफॉसने नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.

डेंग्यूबाधित गावात धूर फवारणीज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले, तेथे आठवड्यातून दोन वेळा धूर फवारणी केली जात आहे. पावसाचे पाणी साचलेल्या डबक्यात गप्पी मासे सोडण्यात येत आहे. आजार बऱ्यापैकी कमी होण्यास यामुळे मदत झाल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.

खुले प्लॉटवर फवारणीचा देखावामहानगरात सध्या ६ डेंग्यू पॉझिटिव्ह शासनदरबारी असले तरी खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. शहरातील अनेक भागातील खुले प्लॉट डास उत्पत्तीची स्थळे बनली आहेत.

सध्या विषाणूजन्य आजाराची साथ सुरू आहे. यावर आरोग्य प्रशासन काम करीत आहे. नागरिकांनीही घराशेजारी साचलेले पाण्याचे डबके कोरडे करावे. टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावावी. झोपताना मच्छरदाणी, धूप अगरबत्ती, लिक्विडचा वापर करावा. शासनाकडून उपाययोजना सुरू आहेच.- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :dengueडेंग्यू