शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांचा जमीन महसूल होणार माफ !

By admin | Updated: November 22, 2015 00:15 IST

जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्याचा नोव्हेंबर अखेर दुष्काळ यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

दुष्काळात दिलासा : १ लाख १५ हजार शेतकऱ्यांना लाभाचे संकेतगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्याचा नोव्हेंबर अखेर दुष्काळ यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ एकरांवर शेती असलेल्या १ लाख १४ हजार ८०४ शेतकऱ्यांचा २० लाखांवर जमीन महसूल माफ होण्याचे संकेत आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी पैसेवारी ही ५० पैशाचे आत आली आहे. मागील वर्षी पैसेवारी ही ४३ पैसे होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा जमीन महसूल माफ करण्यात आला होता. या वर्षी ६ नोव्हेंबरला खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या महसुलात सूट मिळण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी शासन स्तरावर अधिकृत घोषणेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ५ एकरांखालील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी आहेत. व ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांकडून शेतसारा वसूल केला जात नाही. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सामान्य जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल, संकिर्ण महसुलासह अन्य महसूल वसुली करीत असते. यापैकी सामान्य जमीन महसूल हा प्रती शेतकरी तालुकानिहाय वेगळा असला तरी प्रती एकर २० रुपयांच्यादरम्यान असतो. जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने १९६७ गावांमधील २० लाखांवर महसूल माफ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबरपासून तलाठी महसूल गोळा करतात. मार्च अखेरपर्यंत शेतसारा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र कमी पैसेवारी असल्याने जमीन महसुलात सूट मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.