शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची १७ हजार ३३ पदे रिक्त

By गणेश वासनिक | Updated: October 25, 2025 15:06 IST

Amravati : राज्यातील १३ आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची १७ हजार ३३ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब शिक्षण आयुक्त पुणे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या २४ जुलै २०२३ च्या पत्रातून पुढे आली आहे.

अमरावती : राज्यातील १३ आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची १७ हजार ३३ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब शिक्षण आयुक्त पुणे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या २४ जुलै २०२३ च्या पत्रातून पुढे आली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार पेसा क्षेत्रात रिक्त पदांची संख्या ११ हजार ४०० इतकी असून पेसा क्षेत्रातील ‘एसटी’ प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या १७ हजार ३३ इतकी आहे.

सन २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या ७ हजार १६६ होती. यापैकी १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वी करिता टीईटी/ सीटीईटी अर्हता धारण करणारे ४९०४ इतके उमेदवार होते. यात पेसातील बिगर आदिवासींचाही समावेश असून शिक्षण आयुक्तांच्या यादीत आदिवासींचा आकडा १५४४ इतकाच आहे. हे उमेदवार मात्र गेल्या एक वर्षापासून अद्यापही मानधनावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ ऑक्टोबर २०२५ च्या निर्णयानंतरही त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही. पेसा क्षेत्रात निव्वळ रिक्त पदे व अनुसूचित जमातीतील पेसा क्षेत्रातील रिक्त पदे लक्षात घेतली तर उमेदवारांची संख्या ही रिक्त पदांपेक्षा कमी आहेत.

पेसा क्षेत्रातील जिल्हे

राज्यात ३६ जिल्ह्यांपैकी १३ जिल्हे आदिवासी बहुल आहेत. यात ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ,अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर यांचा समावेश आहे.

पेसा क्षेत्रातील शासनाची २०२३ ची आकडेवारी

१) सर्व प्रवर्ग मंजूर पदे - ९१,२९६२) यापैकी एकूण कार्यरत- ८४,८३१३) एकूण रिक्त पदे- ६,४६५४) एकूण मंजूर पदांपैकी अनु.जमाती पेसा क्षेत्र मंजूर पदे-२६,९६८५) पेसा क्षेत्र अनुसूचित पेसा प्रवर्ग कार्यरत पदे -१२,८९६६) पेसा क्षेत्र अनुसूचित प्रवर्ग रिक्त पदे -१४,०७२७) अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त पदे -४७५०

"सर्वोच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्णय देऊन पेसा क्षेत्रातील भरतीचा मार्ग सुकर केला आहे. ‘एसटी’ उमेदवारांना आता कायम नियुक्ती द्यावी. ‘एसटी’चे पात्रता धारक उमेदवार मिळत नसेल तर जिल्ह्यातील ‘एसटी’च्या डी.एड, बी.एड. उमेदवारांची नियुक्ती करून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना पाच वर्षांची संधी उपलब्ध करून द्यावी."-ॲड. प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

English
हिंदी सारांश
Web Title : 17,033 Tribal Teacher Posts Vacant in Maharashtra's PESA Region

Web Summary : Shockingly, 17,033 tribal teacher posts are vacant in Maharashtra's PESA areas. Despite qualified candidates, appointments are pending. Advocate Ghodam urges permanent appointments, offering D.Ed/B.Ed holders five years to pass teacher eligibility tests.
टॅग्स :AmravatiअमरावतीTeachers Recruitmentशिक्षकभरतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना